प्राइम टाईममध्ये गुजराती चित्रपट दाखवण्यास 'मनसे'चा विरोध

By admin | Published: October 5, 2015 10:16 AM2015-10-05T10:16:41+5:302015-10-05T10:23:59+5:30

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने'प्राईम टाईम'च्या स्लॉटमध्ये थिएटर्समध्ये गुजराती वा अन्य प्रादेशिक चित्रपट दाखवण्यास कडाडून विरोध दर्शवला आहे.

MNS opposed to show Gujarati film in prime time | प्राइम टाईममध्ये गुजराती चित्रपट दाखवण्यास 'मनसे'चा विरोध

प्राइम टाईममध्ये गुजराती चित्रपट दाखवण्यास 'मनसे'चा विरोध

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ५ - दुष्काळग्रस्तांना मदत न केल्यास हिंदी चित्रपटांवर बहिष्कार टाकू असा इशारा बॉलिवूडला देणा-या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 'महाराष्ट्रात मराठीच' अशी आग्रही भूमिका पुन्हा घेतली असून 'प्राइम टाईम'च्या स्लॉटमध्ये थिएटर्समध्ये गुजराती वा अन्य प्रादेशिक चित्रपट दाखवण्यास कडाडून विरोध दर्शवला आहे. गेल्या आठवड्यात मनसे कार्यकर्त्यांनी बोरिवलीतील सोना गोल्ड सिनेमा थिएटरबाहेर निदर्शने करत ' गुज्जूभाई दि ग्रेट' या चित्रपटाच्या शोबाबत आक्षेप घेतला. मनसेच्या या भूमिकेवरून आता मराठी  वि. गुजराती वाद चिघळण्याची शक्यता आहे. 
गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मोदींच्या करिष्म्यामुळे भाजपला भरघोस यश मिळालेले असताना मराठीच्या मुद्याचे राजकारण करणा-या राज ठाकरेंची मनसे फारसा प्रभाव पाडू शकली नाही. विकासाच्या मुद्यावर फोकस करणा-या राज ठाकरेंना नाशिकच्या विकासाबाबतचे प्रश्न विचारल्याने ते अडचणीत सापडले. त्यामुळे मनसे आता पुन्हा ' खळ्ळ खट्यॅक ' करण्यास सज्ज झाली असून  प्राइम टाईममध्ये गुजराती वा इतर प्रादेशिक चित्रपट दाखवण्यास विरोध हा याच भूमिकेचा एक भाग आहे. 
राज्यातील मल्टिप्लेक्सनी 'प्राइम टाईम'मध्ये मराठी चित्रपट दाखवणे बंधनकारक केलेले असतानाही, अनेक मल्टिप्लेक्समध्ये हा नियम डावलून प्रादेशिक चित्रपट दाखवण्यात येतात. बोरिवलीतील सोना थिएटरमध्येही प्राइम टाईममध्ये 'गुज्जूभाई दि ग्रेट' या चित्रपटाचा शो ठेवण्यात आला होता आणि मराठी चित्रपटाचा एकही शो त्या स्लॉटमध्ये नव्हता. हे समजताच मनसे कार्यकर्त्यांनी त्या विरोधात निदर्शने करत मराठी चित्रपटाना प्राईम टाईमचा स्लॉट मिळालाच पाहिजे, अशी मागणी केली.
ही फक्त सुरूवात आहे, राज्यात जिथे- जिथे प्राइम टाईमला गुजराती व अन्य प्रादेशिक चित्रपट दाखवले जात असतील त्या थिएटर्सविरोधात आम्ही आंदोलन करू आणि जे थिएटरमालक आम्हाला विरोध करतीला त्यांना मनसे स्टाईल दणका दाखवू, असा इशारा मनसेतर्फे देण्यात आला आहे.
मात्र 'जर प्राइम टाईममध्ये मराठी चित्रपट दाखवता येत असतील तर त्याच स्लॉटमध्ये इतर प्रादेशिक चित्रपट का दाखवू शकत नाही? ' असा सवाल जी ७ मल्टिप्लेक्स व मराठा मंदिरचे एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर मनोज देसाई यांनी विचारला आहे. 'तसेच मुंबई हे कॉस्मोपॉलिटन शहर असून कला व संस्कृतीपासून राजकारण दूर ठेवले पाहिजे' अशी भूमिकाही त्यांनी मांडली.

Web Title: MNS opposed to show Gujarati film in prime time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.