प्रतिरूप विधानसभेला मनसेचा विरोध
By admin | Published: October 3, 2016 09:44 PM2016-10-03T21:44:49+5:302016-10-03T21:44:49+5:30
डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात भरविलेल्या विदर्भाच्या प्रतिरूप विधानसभेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) विरोध केला. मनसेचे उपशहर अध्यक्ष प्रशांत पवार यांच्या
Next
योगेश पांडे / ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 3 - डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात भरविलेल्या विदर्भाच्या प्रतिरूप विधानसभेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) विरोध केला. मनसेचे उपशहर अध्यक्ष प्रशांत पवार यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी देशपांडे सभागृहाबाहेर निदर्शने करीत काळे झेंडे दाखवले. कार्यकर्ते सभागृहात शिरण्याचा प्रयत्नात होते, परंतु पोलिसांचा तगडा बंदोबस्त असल्याने त्यांना यश आले नाही.
याप्रसंगी प्रशांत पवार यांनी विदर्भवाद्यांना विदर्भाच्या विकासाकरिता मनसेसोबत चर्चा करण्याचे आवाहन केले. विदर्भाच्या विकासासाठी आम्ही रस्त्यावर यायला तयार आहोत. विदर्भातून आजवर जे आमदार, खासदार, मंत्री झाले त्यांनी आतापर्यंत विदर्भाचा विकास का केला नाही. पश्चिम महाराष्ट्राचे नेते त्यांच्या भागाचा विकास करू शकतात तर विदर्भाचे नेते का नाही? त्यांच्यात धमक असेल तर त्यांनी मनसेसोबत यावे, आम्ही विदर्भाचा विकास सोबत करू. विकास करण्याकरिता राज्याचे तुकडे करण्याची गरज नाही. प्रतिरुप विधानसभा म्हणजे ढोंगबाजी आहे, अशी टीकाही त्यांनी केली.