"राज्यात जो राजकीय व्याभिचार सुरु आहे तो मी करणार नाही, मला...", राज ठाकरेंचं मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2023 03:02 PM2023-07-13T15:02:28+5:302023-07-13T15:02:44+5:30
राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीनंतर महाराष्ट्र नवनिर्माण नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे चिपळून दौऱ्यावर आहेत.
राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीनंतर महाराष्ट्र नवनिर्माण नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे चिपळून दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी रत्नागिरीतील महाराष्ट्र सैनिकांचा मेळावा घेत त्यांना मार्गदर्शन घेतले. अजित पवारांनी राज्याच्या राजकारणात भूकंप करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर ठाकरेंचा हा प्रथमच दौरा आहे. अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या ९ जणांनी रविवारी मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार पाचव्यांदा राज्याचे उपमुख्यमंत्री झाले तर, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रिफ, धनंजय मुंडे, धर्मरावबाबा आत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे आणि अनिल पाटील यांची मंत्रिपदी वर्णी लागली. कालपर्यंत सत्ताधाऱ्यांवर टीका करणारे आज सत्तेत सहभागी झाल्याने राजकारणातील सद्य परिस्थितीवरून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
दरम्यान, पक्षातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना राज ठाकरेंनी सद्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य केले. "राज्यात जो राजकीय व्याभिचार सुरु आहे तो मी करणार नाही. मला तडजोड करावी लागली तर मी घरात बसेन पण तडजोड करणार नाही", असे राज यांनी रत्नागिरीतील महाराष्ट्र सैनिकांच्या मेळाव्यात म्हटले.
"राज्यात जो राजकीय व्याभिचार सुरु आहे तो मी करणार नाही. मला तडजोड करावी लागली तर मी घरात बसेन पण तडजोड करणार नाही." - सन्मा. श्री. राजसाहेब ठाकरे (रत्नागिरीतील महाराष्ट्र सैनिक मेळाव्यात) #कोकण_दौरा#मनसेचंकोकणpic.twitter.com/DDxqJ6JnYb
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) July 13, 2023
मनसेने दोन दिवसांची राज ठाकरेंच्या कार्यक्रमांची रुपरेषा जाहीर केली आहे. तर्क- वितर्क, राज्याच्या बैठकीत मांडलेली मत याचा खुलासा करण्यासाठी राज ठाकरे मुंबईत मेळावा घेत आहेत. राज ठाकरे आज कोकण दौऱ्यावर असून उद्या ते दापोली आणि मंडणगडला जाणार आहेत.