मनसेच्या ‘राज’वटीत मराठी शाळेस घरघर!
By admin | Published: August 5, 2014 01:26 AM2014-08-05T01:26:14+5:302014-08-05T01:26:14+5:30
शैक्षणिक क्षेत्रतील कार्यकत्र्यानी सुरू केलेल्या येथील मराठी माध्यमाच्या बी.डी. भालेकर हायस्कूलला पुन्हा एकदा घरघर लागली आहे.
Next
नाशिक : शैक्षणिक क्षेत्रतील कार्यकत्र्यानी सुरू केलेल्या येथील मराठी माध्यमाच्या बी.डी. भालेकर हायस्कूलला पुन्हा एकदा घरघर लागली आहे. महापालिकेने शब्द देऊनही प्रत्यक्षात आर्थिक मदतीच्या फायली मात्र लालफितीत अडकल्या आहेत. त्यामुळे विद्याथ्र्याना मोफत गणवेश व अन्य साहित्य न मिळाल्याने मुलांची संख्या घटू लागली आहे.
महापालिकेत सत्ता असलेली मनसे एकीकडे मराठीचा मुद्दा हातात घेते तर दुसरीकडे मराठी शाळांना वाचविण्याचे प्रयत्न केले जात नाहीत, अशी खंत व्यक्त करीत सामाजिक कार्यकत्र्यानी आंदोलनाची तयारी सुरू केली आहे. शहराच्या मध्यवस्तीतील या शाळेतील विद्यार्थीसंख्या कमी होत चालल्याने गेल्याच वर्षी शाळा बंद करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने मांडला होता. त्यानुसार विद्याथ्र्याना सातपूर व सिडकोतील शाळांमध्ये वर्ग करून शाळा बंद करण्यात आली होती. मात्र कार्यकत्र्यानी गरीब मुलांच्या शिक्षणाची परवड होऊ नये म्हणून शाळा पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न केले. त्यांनी दूरवरील विद्याथ्र्याना शाळेत दाखल केले. त्यामुळे जून महिन्यात 65 मुले दाखल झाली. दूरच्या विद्याथ्र्याचा प्रवासखर्च महापालिका करणार होती. मात्र मुलांच्या प्रवास भत्त्याचा निर्णय झालेलाच नाही. (प्रतिनिधी)