Gandhi Jayanti 2022 : "...म्हणूनच गांधीजींसारखं बहुदा दुसरं कोणी होणे नाही"; राज ठाकरेंची खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2022 11:57 AM2022-10-02T11:57:32+5:302022-10-02T13:20:29+5:30

MNS Raj Thackeray And Mahatma Gandhi Jayanti 2022 : "महात्मा गांधी हे गेल्या शतकातील एकमेव असं नेतृत्व असेल की, जे देशांच्या सीमा तोडून पसरत गेले. तेही इंटरनेट, सोशल मीडिया, मोबाईल नसताना."

MNS Raj Thackeray Post over Mahatma Gandhi Jayanti 2022 | Gandhi Jayanti 2022 : "...म्हणूनच गांधीजींसारखं बहुदा दुसरं कोणी होणे नाही"; राज ठाकरेंची खास पोस्ट

Gandhi Jayanti 2022 : "...म्हणूनच गांधीजींसारखं बहुदा दुसरं कोणी होणे नाही"; राज ठाकरेंची खास पोस्ट

googlenewsNext

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांनी गांधी जयंती (Mahatma Gandhi Jayanti 2022) निमित्त खास फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. "आज महात्मा गांधी जयंती. गांधीजींच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन" असं म्हटलं आहे. तसेच "गांधींजींचा प्रभाव असा काही पसरत गेला की, फक्त भारतच नव्हे तर जवळपास तीन खंडातील देशांमध्ये स्वातंत्र्याची आस जागृत झाली आणि ब्रिटिश राजवटीचा सूर्य मावळला. पण जे गांधीजींना जमलं ते पुढे जवळजवळ कोणालाच जमलं नाही" असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. 

राज ठाकरे यांनी "महात्मा गांधी हे गेल्या शतकातील एकमेव असं नेतृत्व असेल की, जे देशांच्या सीमा तोडून पसरत गेले. तेही इंटरनेट, सोशल मीडिया, मोबाईल नसताना. गांधींजींचा प्रभाव असा काही पसरत गेला की, फक्त भारतच नव्हे तर जवळपास तीन खंडातील देशांमध्ये स्वातंत्र्याची आस जागृत झाली आणि ब्रिटिश राजवटीचा सूर्य मावळला. पण जे गांधीजींना जमलं ते पुढे जवळजवळ कोणालाच जमलं नाही."

"गांधीजींचं तत्वज्ञान व्यापक"

"विशिष्ट राजकीय-सामाजिक परिस्थितीत प्रबळ वाटणारे नेते आले, कमालीचे लोकप्रिय झाले आणि पुढे काही वर्षातच मागे पडलेले दिसले आहेत. दुसरं महायुद्ध जिंकल्यावर चर्चिल, जगाला फॅसिझमच्या विळख्यातून सोडवणारा तारणहार म्हणून पुढे आले, पण त्यांची लोकप्रियता पुढे झपाट्याने ओसरली. ह्याला कारण चर्चिल ह्यांचं योगदान एका विशिष्ट परिस्थितीला पूरक होतं, ते चिरकाल टिकावं असं नव्हतं. पण गांधीजींचं तत्वज्ञान व्यापक होतं." असं म्हटलं आहे. 

"गांधीजींच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन"

"शृंखला मग त्या अज्ञानाच्या असोत, की गुलामगिरीच्या, वसाहतवादाच्या की जातींच्या, त्या शृंखलांनी कुठल्याही माणसाला बांधून ठेवण्याचा अधिकार कोणालाच नाही, कारण सगळी माणसं ही मुळात समान आहेत, इतकं सोपं तत्व त्यांनी स्वीकारलं आणि त्यासाठी त्यांनी संघर्ष केला. हे खूप कठीण आणि दुर्मिळ आहे, म्हणूनच गांधीजींसारखा बहुदा दुसरं कोणी होणे नाही. आज महात्मा गांधी जयंती. गांधीजींच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन" असंही राज ठाकरे यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. यासोबतच राज ठाकरे यांनी लाल बहादुर शास्त्री यांनाही जयंतीनिमित्त अभिवादन केले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
 

Web Title: MNS Raj Thackeray Post over Mahatma Gandhi Jayanti 2022

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.