Raj Thackeray : राज ठाकरेंनी मानले 'मनसे' आभार, म्हणाले, वाढदिवसाचे सोहळे असेच साजरे व्हायला हवेत!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2023 10:57 AM2023-06-15T10:57:10+5:302023-06-15T11:14:10+5:30
MNS Raj Thackeray : राज ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानले आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा काल वाढदिवस अत्यंत आनंदात साजरा करण्यात आला. त्यांच्या वाढदिवशी राज्यभरातून कार्यकर्ते त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आले होते. प्रत्येकाला भेटता यावं याकरता राज ठाकरेंनी देखील खास वेळ बाजुला काढून ठेवला होता. पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने शिवतीर्थावर भेटण्यासाठी आले होते. यानंतर आता राज ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानले आहेत.
"माझ्या महाराष्ट्र सैनिकांशी झालेली नजरभेट सुद्धा खूप उत्साह आणि आनंद देणारी होती. वाढदिवस हा सोहळा न होता तो लोकोपयोगी व्हावा ह्या उद्देशाने वाढदिवसाला भेटवस्तू आणि मिठाईच्या ऐवजी शालेय साहित्य आणि रोपं आणा असं सुचवलं होतं, ज्याला महाराष्ट्र सैनिकांनी उत्तम प्रतिसाद दिला, ह्याबद्दल धन्यवाद" असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक खास पोस्ट शेअर करत राज ठाकरे यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.
सस्नेह जय महाराष्ट्र,
— Raj Thackeray (@RajThackeray) June 15, 2023
काल वाढदिवसाच्या दिवशी हजारोंच्या संख्येने माझे महाराष्ट्र सैनिक, मला भेटायला, शुभेच्छा द्यायला शिवतीर्थावर आले. प्रत्येकाशी बोलण्याची इच्छा असली तरी ते शक्य नव्हतं, पण प्रत्येकाशी नजरानजर तरी झाली. माझ्या महाराष्ट्र सैनिकांशी झालेली नजरभेट सुद्धा खूप… pic.twitter.com/6AcBdmbk68
"सस्नेह जय महाराष्ट्र,
काल वाढदिवसाच्या दिवशी हजारोंच्या संख्येने माझे महाराष्ट्र सैनिक, मला भेटायला, शुभेच्छा द्यायला शिवतीर्थावर आले. प्रत्येकाशी बोलण्याची इच्छा असली तरी ते शक्य नव्हतं, पण प्रत्येकाशी नजरानजर तरी झाली. माझ्या महाराष्ट्र सैनिकांशी झालेली नजरभेट सुद्धा खूप उत्साह आणि आनंद देणारी होती.
ह्याशिवाय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून फोन, एसएमएस, आणि समाजमाध्यमांतून शब्दशः शुभेच्छांचा वर्षाव सुरु होता, ह्या सगळ्या शुभेच्छांसाठी मी अत्यंत ऋणी आहे.
विशेषतः ट्विटरवर अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या, त्या माझ्यापर्यंत पोहचल्या आणि मी त्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. वाढदिवस हा सोहळा न होता तो लोकोपयोगी व्हावा ह्या उद्देशाने वाढदिवसाला भेटवस्तू आणि मिठाईच्या ऐवजी शालेय साहित्य आणि रोपं आणा असं सुचवलं होतं, ज्याला महाराष्ट्र सैनिकांनी उत्तम प्रतिसाद दिला, ह्याबद्दल धन्यवाद. वाढदिवसाचे सोहळे हे असेच साजरे व्हायला हवेत. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद." असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.