Maharashtra Political Crisis: “सत्तेविना मती गेली, जो मिळेल त्याच्याशी युती केली…!”; मनसेची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2022 01:28 PM2022-08-27T13:28:03+5:302022-08-27T13:28:30+5:30

Maharashtra Political Crisis: संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना यांच्यात युती झाल्यानंतर मनसे नेते राजू पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

mns raju patil criticised shiv sena chief uddhav thackeray after alliance with sambhaji brigade | Maharashtra Political Crisis: “सत्तेविना मती गेली, जो मिळेल त्याच्याशी युती केली…!”; मनसेची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका

Maharashtra Political Crisis: “सत्तेविना मती गेली, जो मिळेल त्याच्याशी युती केली…!”; मनसेची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका

Next

Maharashtra Political Crisis: राज्यभरातून एकनाथ शिंदे गटाला (Eknath Shinde) वाढता पाठिंबा शिवसेनेसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पक्ष आणि संघटना वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळत आहेत. यातच आता शिवसेनेने संभाजी ब्रिगेडशी युती करत शिंदे गटासमोर नवे आव्हान उभे केल्याची चर्चा आहे. यावरून राजकीय वर्तुळातून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झटत असून, आता मनसेनेही शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे. 

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत मोठी फूट पडली. शिवसेना पुन्हा उभारी घेण्यासाठी प्रयत्न करत असतानाच राज्यात नवं राजकीय समीकरण तयार झाले आहे. राज्यात शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांच्यात युती झाली आहे. प्रादेशिक अस्मिता टिकवण्यासाठी तसेच संविधान टिकवण्यासाठी युती केली असल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. तर शिवसेनेसोबत का युती केली, याचे कारण संभाजी ब्रिगेडने सांगितले. यावरून मनसे नेते आणि आमदार राजू पाटील यांनी हल्लाबोल केला आहे. 

जो मिळेल त्याच्याशी युती केली…!

राजू पाटील यांनी ट्विट करत शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे. सत्तेविना मती गेली, जो मिळेल त्याच्याशी युती केली…!, असे राजू पाटील यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. तत्पूर्वी, संभाजी ब्रिगेडने आजवर स्थानिक स्वराज्य संस्थांपासून ते विधानसभा, लोकसभा निवडणुकीत समविचारी पक्षांनी घेऊन एकत्र लढण्याचे धोरण अवलंबले आहे. आमची सातत्याने हीच भूमिका राहिली आहे. आतादेखील महाराष्ट्राचे हित जोपासण्यासाठी संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेने एकत्र वाटचाल करण्याचे ठरवले आहे, असे संभाजी ब्रिगेडने म्हटले आहे. 

दरम्यान, शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्र आल्याचा मला आनंद आहे. आपली भूमिका रोखठोक आहे. ती आपल्याला पटली म्हणून आपण एकत्र आलो आहोत. आम्ही सत्तेत होतो, सत्ता पुढे येणारच आहे. काही नसताना तुम्ही सोबत आलेला आहात. ही आपली वैचारिक युती झाली आहे, असे प्रतिपादन उद्धव ठाकरे यांनी केले. या लढवय्या सहकाऱ्यांचे स्वागत करतो. संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना एकत्र येऊन आपण मोठा इतिहास घडवू, असा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
 

Web Title: mns raju patil criticised shiv sena chief uddhav thackeray after alliance with sambhaji brigade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.