मनसेचा पाकिस्तानी कलाकारांविरोधातील आंदोलन मागे घेण्यास नकार
By admin | Published: October 6, 2016 03:52 PM2016-10-06T15:52:29+5:302016-10-06T15:52:29+5:30
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाकिस्तानी कलाकारांविरोधात सुरु केलेलं आंदोलन मागे घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे 'रईस' आणि 'ए दिल है मुश्किल' चित्रपटावरील टांगती तलावर अद्यापही कायम आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 6 - उरी दहशतवादी हल्ल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाकिस्तानी कलाकारांविरोधात सुरु केलेलं आंदोलन मागे घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे 'रईस' आणि 'ए दिल है मुश्किल' चित्रपटावरील टांगती तलावर अद्यापही कायम आहे.
इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्यूसर्स असोसिएशनच्या सदस्यांनी मनसे नेत्यांची भेट घेत 'रईस' आणि 'ए दिल है मुश्किल' चित्रपट रिलीज होऊ देण्याची विनंती केली. मात्र मनसेने हे आता मनसेचं आंदोलन राहिलं नसून प्रत्येक सामान्य व्यक्तीचं आंदोलन असल्याचं सांगत विनंती फेटाळून लावली. इम्पाच्या सदस्यांनीही मनसे नेत्यांची भेट घेत पुर्ण झालेल्या चित्रपटांच्या रिलीजला विरोध करु नये अशी विनंती केली, मात्र मनसेने आपली विरोध मागे घेण्यास नकार देत आंदोलन कायम ठेवण्याचा पवित्रा घेतला.
#FLASH Members of Indian Motion Picture Producers Assc met MNS office bearers to demand release of 'Ae Dil Hai Mushkil' and 'Raees'
— ANI (@ANI_news) October 6, 2016