Sandeep Deshpande : "जेव्हा राणे साहेबांनी शिवसेना सोडली होती तेव्हा..."; अयोध्या दौऱ्यावरुन मनसेचा आदित्य ठाकरेंना टोला 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 10:38 AM2022-06-15T10:38:58+5:302022-06-15T11:04:45+5:30

MNS Sandeep Deshpande Slams Aditya Thackeray : मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे.

MNS Sandeep Deshpande Slams Aditya Thackeray Over Ayodhya | Sandeep Deshpande : "जेव्हा राणे साहेबांनी शिवसेना सोडली होती तेव्हा..."; अयोध्या दौऱ्यावरुन मनसेचा आदित्य ठाकरेंना टोला 

Sandeep Deshpande : "जेव्हा राणे साहेबांनी शिवसेना सोडली होती तेव्हा..."; अयोध्या दौऱ्यावरुन मनसेचा आदित्य ठाकरेंना टोला 

Next

मुंबई - शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आज अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यासाठी शिवसेनेचे मोजकेच नेते वगळता आमदारांना दौऱ्यावर जाता येणार नाही. विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेने ही भूमिका घेतली आहे. या अयोध्या दौऱ्यासाठी आता केवळ शिवसैनिक आदित्य ठाकरेंच्या सोबत जातील तर आमदारांना दौऱ्यावर येण्यास मनाई करण्यात आली आहे. याच दरम्यान मनसेने पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंना टोला लगावला आहे. "काही जण तर घरी बसून लॉलीपॉपचा त्यावेळी आस्वाद घेत असतील" असं म्हणत जोरदार निशाणा साधला आहे. 

मनसेने "सेटिंग करून दौरा आणि हिंमत असणं यातला फरक आहे" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. मनसे नेते संदीप देशपांडे (MNS Sandeep Deshpande) यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "आज एक जुनी गोष्ट आठवली जेव्हा राणे साहेबांनी शिवसेना सोडली होती तेव्हा पोटनिवडणुकीत आज अयोध्येत असलेल सगळे शिवसेनेचे नेते शेपूट घालून बसले होते काही जण तर घरी बसून लॉलीपॉपचा त्या वेळी आस्वाद घेत असतील. फक्त राजसाहेबच तिथे प्रचार करत होते. सेटिंग करून दौरा आणि हिंमत असणं यातला फरक आहे" असं देशपांडे यांनी म्हटलं आहे. 

"ढोंगी हिंदुत्वावरुन असली हिंदुत्वाकडे प्रवास सुरू होवो"

मनसेने अयोध्या दौऱ्यावरून जोरदार निशाणा साधला आहे. "रामलल्लाचे दर्शन घेऊन आल्यावर तरी यांचा ढोंगी हिंदुत्वावरुन असली हिंदुत्वाकडे प्रवास सुरू होवो" असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते गजानन काळे (MNS Gajanan Kale) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.

"अयोध्येला जाऊन रामलल्लाचे दर्शन घेऊन आल्यावर तरी यांचा ढोंगी हिंदुत्वावरुन असली हिंदुत्वाकडे प्रवास सुरू होवो…आणि औरंगाबादचे नाव संभाजीनगर होवो, मशिदीवरचे भोंगे उतरो आणि रस्त्यावरचा नमाज बंद करण्याचे धाडस यांच्यात येवो… विधानपरिषदेत तरी MIM व सपाची मदत न घेण्याची सुबुद्धी मिळो" असं ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

Web Title: MNS Sandeep Deshpande Slams Aditya Thackeray Over Ayodhya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.