Shalini Thackeray : "राज ठाकरेंचा 'तो' सल्ला कदाचित राऊतांना जेलमध्ये उपयोगी येईलच"; मनसेचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2022 11:09 AM2022-08-01T11:09:18+5:302022-08-01T11:20:27+5:30

MNS Shalini Thackeray slams Shivsena Sanjay Raut :  मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी संजय राऊतांवर जोरदार निशाणा साधला आहे.

MNS Shalini Thackeray slams Shivsena Sanjay Raut Over ED | Shalini Thackeray : "राज ठाकरेंचा 'तो' सल्ला कदाचित राऊतांना जेलमध्ये उपयोगी येईलच"; मनसेचा खोचक टोला

Shalini Thackeray : "राज ठाकरेंचा 'तो' सल्ला कदाचित राऊतांना जेलमध्ये उपयोगी येईलच"; मनसेचा खोचक टोला

googlenewsNext

मुंबई - पत्राचाळ पुनर्विकासात झालेल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत चांगलेच अडचणीत आले असून, रविवारी सकाळी ७ वाजता ईडीच्या अधिकाऱ्यांनी अचानक त्यांच्या भांडूप येथील घरी छापेमारी केली. त्यात ईडीच्या अधिकाऱ्यांना ११ लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम सापडली. याचसोबत काही कागदपत्रे अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतली. ते चौकशीत सहकार्य करत नसल्याचे सांगत सायंकाळी पावणेसहाच्या दरम्यान राऊत यांना ईडीने बॅलॉर्ड इस्टेट येथील कार्यालयात  चौकशीसाठी आणले. रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. यानंतर त्यांना मध्यरात्री अटक करण्यात आली. यावरून मनसेने राऊतांना खोचक टोला लगावला आहे. 

मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे (MNS Shalini Thackeray) यांनी संजय राऊतांवर (Shivsena Sanjay Raut) जोरदार निशाणा साधला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट केलं आहे. "राज साहेबांनी संजय राऊत यांना एकट्यात बोलण्याची सवय लावावी असा सल्ला दिला होता, आज तो सल्ला कदाचित राऊतांना जेलमध्ये उपयोगी येईलच....!!!" असं शालिनी ठाकरे यांनी म्हटलं आहे. याआधी देखील "रेल्वे इंजिन भाड्याने द्या म्हणून उपदेश देणार्‍यांवर धनुष्यबाण डोहाळे जेवणासाठी भाड्याने देण्याची वेळ आली आहे" असं म्हणत शालिनी ठाकरे यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना लगावला होता.

"सत्ता स्थापन करताना भगवा नव्हता, अटक होताना भगवा गळ्यात कशाला?"

भाजपाने संजय राऊतांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "भगवा हा सोयीचा विषय नाही की तुम्ही अडचणीत असाल तेव्हा वापरावा, नसेल तेव्हा काढून ठेवावा" असं म्हणत निशाणा साधला आहे. भाजपाचे नेते अतुल भातखळकर (BJP Atul Bhatkhalkar) यांनी संजय राऊतांवर जोरदार टीका केली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "भगवा हा सोयीचा विषय नाही की तुम्ही अडचणीत असाल तेव्हा वापरावा, नसेल तेव्हा काढून ठेवावा" असं म्हटलं आहे. तसेच यासोबतच दोन फोटो देखील शेअर केले आहेत. 

सत्ता स्थापन करताना भगवा नव्हता आणि अटक होताना भगवा गळ्यात कशाला? असं त्या फोटोंवर लिहिलं आहे. "चढ़ता है सूरज ढलता है, यह झूठ न ज़्यादा चलता है, पल दो पल का उजाला है झूठ का, अरे काला है जी काला, मूह काला है झूठ का" असं देखील अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्यावर भ्रष्टाचाराचे आणि आर्थिक घोटाळ्याचे आरोप केले होते. या प्रकरणी चौकशीसाठी संजय राऊत यांना ईडीने चार वेळा समन्स बजावले होते. 

Web Title: MNS Shalini Thackeray slams Shivsena Sanjay Raut Over ED

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.