राज्यभरात मनसे लढविणार 200 जागा

By admin | Published: September 21, 2014 03:06 AM2014-09-21T03:06:58+5:302014-09-21T03:06:58+5:30

राज्यभरात 200 उमेदवार उभे करण्याची मनसेची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, विदर्भ व प. महाराष्ट्रात तुलनेने कमी उमेदवार उभे केले जाणार आहेत.

MNS will fight 200 seats in the state | राज्यभरात मनसे लढविणार 200 जागा

राज्यभरात मनसे लढविणार 200 जागा

Next

 अतुल कुलकर्णी - मुंबई

राज्यभरात 200 उमेदवार उभे करण्याची मनसेची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, विदर्भ व प. महाराष्ट्रात तुलनेने कमी उमेदवार उभे केले जाणार आहेत. नावांची अधिकृत घोषणा लवकरच केली जाईल, असे पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितले.
‘लोकमत’शी बोलताना नांदगावकर म्हणाले, आम्ही मराठवाडय़ात जवळपास सर्व जागांवर उमेदवार देणार आहोत. विदर्भातही जवळपास 35 ते 4क् उमेदवार निश्चित  केले आहेत. मुंबई, ठाणो, नवी मुंबई, पुणो आणि नाशिक या ठिकाणच्या सगळ्या जागा मनसे लढणार आहे. प. महाराष्ट्रातही उमेदवार उभे करत आहोत. येत्या 25 सप्टेंबर रोजी, मनसेचे व्हिजन डॉक्युमेंट मुंबईत सादर होणार आहे. सत्ता आली तर राज्यात काय करायचे याचे विस्तृत चित्र त्यात असेल, असेही नांदगावकर म्हणाले. 
दरम्यान, भाजपा-सेना आणि दोन्ही काँग्रेस यांचे काय होते त्यानुसार कोणासोबत जायचे, किती जागा कोणासाठी सोडायच्या याचे गणित सध्या मनसेत चालू आहे. 25 तारखेला राज ठाकरे प्रचाराचा शुभारंभ करणार असून, त्या वेळी ते आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.
 
भाजपाकडून राजना बुके!
मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या आजारी आहेत. त्यांना लवकर आराम पडावा म्हणून भाजपाच्या दिल्लीतील एका वरिष्ठ नेत्याने ‘गेटवेल सून’ म्हणत त्यांना पुष्पगुच्छ पाठवल्याचे समजते. राज्यातल्या बदलत्या समीकरणाच्या पाश्र्वभूमीवर या पुष्पगुच्छालादेखील महत्त्व आले आहे.

Web Title: MNS will fight 200 seats in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.