‘एप्रिलनंतर मनसे चमत्कार घडवणार’

By admin | Published: February 21, 2016 01:19 AM2016-02-21T01:19:00+5:302016-02-21T01:19:00+5:30

स्वत:ला पृथ्वीसारखे समजा. पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत असते. त्यामुळे पृथ्वीवर सूर्योदय आणि सूर्यास्त या प्रक्रिया घडत असतात. त्यामुळे आता सूर्यास्त समजा, परंतु सूर्योदय

'MNS will make a miracle after April' | ‘एप्रिलनंतर मनसे चमत्कार घडवणार’

‘एप्रिलनंतर मनसे चमत्कार घडवणार’

Next

नाशिक : स्वत:ला पृथ्वीसारखे समजा. पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत असते. त्यामुळे पृथ्वीवर सूर्योदय आणि सूर्यास्त या प्रक्रिया घडत असतात. त्यामुळे आता सूर्यास्त समजा, परंतु सूर्योदय होणारच आहे. ओहोटीनंतर भरती येतच असते. एप्रिलनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे सर्व जण बघायला लागतील, असा चमत्कार घडणार असल्याचे भाकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी नवनियुक्त पदाधिकारी आणि नगरसेवकांच्या मेळाव्यात केले.
येत्या पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी आणि नगरसेवकांना उभारी देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. राज म्हणाले, पराभव आणि विजय या गोष्टी घडतच असतात. मी दौरे करत नाही, भाषणे करत नाही, अशा चर्चा होत असतात. जेव्हा दुसरे नुसते बसलेले असतात तेव्हा मी विचार करत असतो, हे राम गणेश गडकरी यांचे उदाहरणही राज यांनी दिले. काही माणसे सोडून गेली म्हणजे महाराष्ट्राचा विकास थांबणार नाही. पराभव चाखल्याशिवाय आपण कुठे आहोत हे कळत नाही. परंतु हातावर हात ठेवून बसू नका. पेशंटसारखे पडून राहू नका. डॉक्टर येईल आणि इंजेक्शन देईल मग उभारी येईल, अशा भ्रमात राहू नका, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)

Web Title: 'MNS will make a miracle after April'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.