मनोरुग्णाकडून नांदेडात बस पळविण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 01:25 AM2017-07-18T01:25:59+5:302017-07-18T01:25:59+5:30
शहरातील मध्यवर्ती बसस्थानकात नांदेडहून नागपूरला जाण्यासाठी फलाटावर उभ्या असलेल्या बसमध्ये चढून ती पळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका मनोरुग्णाला
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : शहरातील मध्यवर्ती बसस्थानकात नांदेडहून नागपूरला जाण्यासाठी फलाटावर उभ्या असलेल्या बसमध्ये चढून ती पळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका मनोरुग्णाला बसचालकाने प्रवाशांच्या मदतीने पकडले़ त्याला वजिराबाद पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. दानाजी दिनेश बाबू (रा़ कामारेड्डी, तेलंगण) असे या मनोरुग्णाचे नाव आहे.
सोमवारी पहाटे पाचच्या सुमारास नागपूर आगाराची नांदेड-नागपूर ही बस चालकाने फलाटावर उभी केली. या बसमध्ये आठ - दहा प्रवासी चढले़ बस स्थानकाबाहेर नेण्यापूर्वी टायरची तपासणी करण्यासाठी चालक खाली उतरला होता.
मात्र खाली उतरताना त्याने केबिनचा दरवाजा उघडाच ठेवला़ तेवढ्यात पस्तीशीतील एक व्यक्ती चालकाच्या केबिनमध्ये शिरला.
ही बाब समजताच बसचालक
धावत येऊन त्याला खाली
उतरण्यास सांगितले, परंतु तो काहीएक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता़ त्यानंतर चार प्रवाशांच्या मदतीने चालकाने त्याला
केबिनमधून बाहेर काढले आणि बसस्थानक चौकीतील पोलिसांच्या हवाली केले़