कोल्हापुरात जमावाचा पोलीस ठाण्यावर हल्ला

By admin | Published: August 24, 2014 01:28 AM2014-08-24T01:28:03+5:302014-08-24T01:28:03+5:30

पोलिसांनी मारहाण केल्याने अटकेतील तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत संतप्त झालेल्या जमावाने शनिवारी सायंकाळी पोलीस ठाण्यावर जोरदार हल्ला केला.

Mob attack police station in Kolhapur | कोल्हापुरात जमावाचा पोलीस ठाण्यावर हल्ला

कोल्हापुरात जमावाचा पोलीस ठाण्यावर हल्ला

Next
पेठवडगाव (जि़ कोल्हापूर) : पोलिसांनी मारहाण केल्याने अटकेतील तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत संतप्त झालेल्या जमावाने शनिवारी सायंकाळी पोलीस ठाण्यावर जोरदार हल्ला केला. दगडफेकीसह परिसरातील गाडय़ांची तोडफोडही करण्यात आली. पोलीस व्हॅन व अन्य वाहने त्यातून सुटली नाहीत. दगडफेकीत अप्पर पोलीस अधीक्षकांसह चार पोलीस जखमी झाले आहेत. दरम्यान, पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी सहायक पोलीस निरीक्षक संजीव पाटील व त्यांच्या दोन सहकारी पोलिसांना तात्काळ निलंबित केले.  जगदीश ऊर्फ  सनी पोवार (29) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आह़े 
पेठवडगाव येथे दोन गटांतील हाणामारीनंतर शनिवारी केएमटीवर दगडफेक करणा:या सनी ऊर्फ जगदीश प्रकाश पोवार याला पोलिसांनी अटक केली. त्यानंतर तब्येत बिघडल्याने त्यास कोल्हापूरच्या छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात घेऊन जाताना वाटेत त्याचा मृत्यू झाला. सनीचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीत झाल्याच्या संशयावरून 6क् जणांच्या जमावाने पेठवडगाव पोलीस ठाण्यावर हल्ला केला. या हल्ल्यात अप्पर पोलीस अधीक्षकांसह चार पोलीस जखमी झाले. जमावाने पोलीस ठाण्यावर दगडफेक करून प्रचंड मोडतोड केली. 
या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला. या घटनेनंतर वडगाव शहरात अघोषित बंद पाळण्यात आला. शहरात तणावपूर्ण परिस्थिती आहे. (प्रतिनिधी)
 
दोषींवर कारवाई करू  
मृत सनी पोवार याच्या शवविच्छेदनाच्या अहवालानंतर या प्रकरणाची सीआयडी चौकशी होऊन संबंधित दोषींवर कारवाई केली जाईल. दोन गटांत व दोन समाजांत तेढ निर्माण होईल असे वातावरण कुणीही निर्माण करू नये.
 - डॉ. मनोजकुमार शर्मा,
पोलीस अधीक्षक , कोल्हापूर
 
वीस ते पंचवीस मिनिटे धुमाकूळ
च्संतप्त जमाव साडेसहा वाजण्याच्या सुमारास पोलीस ठाण्यावर चाल करून आला. त्यांनी पोलीस ठाण्याजवळ असणा:या दोन ट्रकवरही दगडफेक केली. तसेच त्यांनी पोलीस ठाण्यावरील बोर्ड, खिडक्या, दरवाजे, परिसरातील वाहने, पोलीस व्हॅन, गुनतील जप्त वाहने यांवर प्रचंड दगडफेक केली. तसेच पोलिसांची टाटा सुमो गाडीही उलटवली. सुमारे वीस ते पंचवीस मिनिटे हा धुमाकूळ सुरू होता. यावेळी पोलीस ठाण्याच्या मुख्य दरवाजा पोलिसांनी कुलूप लावून बंद केला. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

 

Web Title: Mob attack police station in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.