मुंबई पोलिसांसाठी आता ‘मोबाइल कॅन्टीन’

By admin | Published: June 9, 2017 05:19 AM2017-06-09T05:19:19+5:302017-06-09T05:19:19+5:30

सभा, मोर्चे, निवडणुका व संवेदनशील ठिकाणी बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या मुंबई पोलिसांच्या उपासमारीच्या समस्येचे आता निराकरण झालेले आहे.

'Mobile Canteen' for Mumbai Police | मुंबई पोलिसांसाठी आता ‘मोबाइल कॅन्टीन’

मुंबई पोलिसांसाठी आता ‘मोबाइल कॅन्टीन’

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई :सभा, मोर्चे, निवडणुका व संवेदनशील ठिकाणी बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या मुंबई पोलिसांच्या उपासमारीच्या समस्येचे आता निराकरण झालेले आहे. आता त्यांना घटनास्थळीच पौष्टिक जेवण व नाश्ताची उपलब्धता करून देणारे ‘मोबाइल कॅन्टीन’अर्थात फिरते उपाहारगृह कार्यान्वित करण्यात आले आहे.
पोलिसांच्या जुन्या व्हॅनमध्ये बदल करून टेबलसह आठ जणांच्या बैठकीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यामुळे त्यांना बंदोबस्ताच्या ठिकाणी पौष्टिक अन्न उपलब्ध होणार आहे. या वाहनामध्ये सुरक्षिततेची आवश्यक खबरदारी घेत शेगडी, गॅस सिलिंडर, वॉश बेसिन, पाण्याची टाकी अशी व्यवस्था करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांच्या ‘मिल्स आॅन व्हील’ या संकल्पनेतून ही सुविधा कार्यरत करण्यात आल्याचे मोटार परिवहन विभागाचे अपर आयुक्त अतुल पाटील यांनी सांगितले.
अतिरेक्यांच्या ‘टार्गेट’वर असलेल्या मुंबईत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना अहोरात्र कार्यरत राहावे लागते. बंदोबस्तासाठी एका ठिकाणी तैनात असताना त्यांना तेथून बाजूला जाता येत नाही. त्यामुळे मिळेल तो खाद्यपदार्थ, वडापाव वगैरे खाऊन वेळ काढावी लागते.
बाहेरच्या या पदार्थांमुळे त्यांना रक्तदाब, मधुमेह व अन्य विकार होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढत असल्यामुळे पोलीस आयुक्त पडसलगीकर यांनी त्यांना घटनास्थळी पौष्टिक आहार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याची सूचना केली होती. या सूचनेनुसार आता ‘एमटी’ विभागाने पोलिसांसाठी फिरते उपाहारगृह सुरू केले आहे.

Web Title: 'Mobile Canteen' for Mumbai Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.