मोबाइल हरवला, चोरीला गेला? विसरून जा! हरवलेला मोबाइल मिळण्याचे प्रमाण नगण्य

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2023 07:37 AM2023-08-23T07:37:20+5:302023-08-23T07:37:47+5:30

कोणत्या राज्यात मोबाईलचा शोध लागण्याचे प्रमाण किती, जाणून घ्या सविस्तर

Mobile lost, stolen? Forget it! The rate of recovery of lost mobiles is negligible | मोबाइल हरवला, चोरीला गेला? विसरून जा! हरवलेला मोबाइल मिळण्याचे प्रमाण नगण्य

मोबाइल हरवला, चोरीला गेला? विसरून जा! हरवलेला मोबाइल मिळण्याचे प्रमाण नगण्य

googlenewsNext

सागर सिरसाट

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: समजा तुमचा मोबाइलचोरीला गेला किंवा हरवला. तो तसा जाऊ नयेच.  पण फक्त समजा. असा गेलेला मोबाइल परत मिळण्याची तुम्हाला किती टक्के शाश्वती वाटते? काय म्हणालात? असे काही नेमकेपणाने सांगता येणार नाही? जरा थांबा. आम्ही सांगतो. आमच्याकडे आहे याचे नेमके उत्तर. जर का तुमचा मोबाइल चोराने पळवून नेला तर तो परत मिळण्याची शक्यता आहे फक्त १३ टक्के. होय. आणि हे खुद्द सरकारच सांगते बरं का. दूरसंचार विभागाच्या सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर (सीईआयआर) पोर्टलने हे गुपित उघड केले आहे.

१३% एवढेच महाराष्ट्रात हरवलेल्या मोबाइलचा शोध लागण्याचे प्रमाण आहे. तेलंगणाने बाजी मारली असून, चोरीला गेलेले किंवा हरवलेले ५,८३६ मोबाइल तेलंगणातील पोलिस यंत्रणेने शोधले. हे प्रमाण ७१.१२ टक्के आहे. सीईआयआर हे पोर्टल १७ मे रोजी देशभरात अधिकृतपणे सुरू झाले होते. परंतु ते प्रायोगिक तत्त्वावर तेलंगणामध्ये १९ एप्रिल २०२३ रोजीच सुरू करण्यात आले होते. त्यामुळे त्या राज्यात शोधलेल्या मोबाइलचे प्रमाण अधिक दिसते. 

प्रमुख राज्यांची कामगिरी

                    ब्लॉक        ट्रेस       रिकव्हर  प्रमाण

  • महाराष्ट्र    १,०४,२७०    ३७,३०३     ४,९०४    १३.१५%
  • दिल्ली     ३,८१,५२१     २,१२,८३९    १,५५३    —
  • मध्य प्रदेश    ३,९९१    १,१२१    २२१    १९.७१%
  • गुजरात    ३,२६५    ८८१    १६४    १८.६२%
  • बिहार    ६,०४०    १,९४०    ३१७    १६.३४%
  • उत्तर प्रदेश    १५,९५४    ५,०२०    ७२२    १४.३८%
  • तामिळनाडू    ४,१९३    १,१३३    १८०    १५.८९%
  • पंजाब    ४,४४६    १,३१६    १८६    १४.१३%
  • हरयाणा    ६,२६२    २,०६३    २४४    ११.८३%


टॉप टेन राज्यांची कामगिरी
                   ब्लॉक    ट्रेस    रिकव्हर    प्रमाण

  • तेलंगणा    ५६,८३४    ८,२०६    ५,८३६    ७१.१२%
  • आंध्र प्रदेश    १३,६९६    १,८८७    १,०९१    ५७.८२%
  • कर्नाटक    १,०७,२३२    १७,०४६    ९,७५९    ५७.२५%
  • मेघालय    ५१२    १४८    ६६    ४४.५९%
  • हिमाचल    १,०६५    २४२    ९४    ३८.८४ %
  • केरळ    ४,८४७    १,२८५    ३३३    २५.९१%
  • सिक्कीम    १५०    ३९    १०    २५.६४%
  • कोलकाता    २,६०७    ३४७    ८५    २३.५०%
  • गोवा    २,४९९    ८८०    २०१    २२.८४%
  • प. बंगाल    १३,८७९    २,३४४    ५०३    २१.४६%


सर्वाधिक माेबाइल दिल्लीत चाेरीला गेले असून त्या खालाेखाल कर्नाटकमध्ये चाेरीचे प्रमाण अधिक आहे. माेबाइल ट्रेस हाेतात पण सापडत नाहीत, हेही आढळले.

Web Title: Mobile lost, stolen? Forget it! The rate of recovery of lost mobiles is negligible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.