नक्षली भागात मोबाइल टॉवर

By Admin | Published: June 13, 2015 02:07 AM2015-06-13T02:07:31+5:302015-06-13T02:07:31+5:30

जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागासाठी शासनान ७८ टॉवर मोबाइल मंजूर केले असून, यातील ११ टॉवर्सचे बांधकाम पूर्ण झाले असून, नऊ टॉवरचे बांधकाम सुरू आहे.

Mobile tower in naxal areas | नक्षली भागात मोबाइल टॉवर

नक्षली भागात मोबाइल टॉवर

googlenewsNext

दिगांबर जवादे, गडचिरोली
जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागासाठी शासनान ७८ टॉवर मोबाइल मंजूर केले असून, यातील ११ टॉवर्सचे बांधकाम पूर्ण झाले असून, नऊ टॉवरचे बांधकाम सुरू आहे. टॉवरची संख्या वाढल्याने विकासास गती मिळून नक्षल चळवळीस मोठा हादरा बसण्याची वर्तविली जात आहे.
गडचिरोली जिल्ह्यात सद्य:स्थितीत बीएसएनएलचे १२५ टॉवर आहेत. जिल्ह्याचा विस्तार लक्षात घेता टॉवरची संख्या अत्यंत कमी आहे. दुर्गम व नक्षलग्रस्त भागात मोबाइल टॉवर नसल्याने संदेशवहनात अडचणी निर्माण होत होत्या. नक्षल्यांकडून याचा गैरफायदा घेतला जात होता. पोलिसांनाही नक्षलविरोधी अभियान राबविताना अनेक अडचणी येत होत्या. ही बाब लक्षात घेऊन शासनाने नक्षलग्रस्त भागात मोबाइलचे जाळे तयार करण्याचा निर्णय घेतला. त्या अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम व नक्षलग्रस्त भागात मोबाइल टॉवर उभारण्यास मंजुरी दिली आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाने मागील वर्षी ३७ मोबाइल टॉवर उभारण्याला मंजुरी दिली. वर्षभराच्या कालावधीत यातील ११ टॉवरचे बांधकाम पूर्ण झाले आहे. नऊ टॉवरचे बांधकाम सुरू आहे. तर उर्वरित १७ टॉवरच्या बांधकामाला लवकरच सुरूवात होणार असल्याची माहिती बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी दिली. फेज-सात अंतर्गत २० टॉवरचे बांधकाम मंजूर केले आहे. गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने १५ टॉवरला मंजुरी दिली आहे. या टॉवरचे बांधकामही बीएसएनएल लवकरच सुरू करणार आहे. नक्षलग्रस्त जिल्हा असल्याने जिल्'ात सीआरपीएफचे हजारो जवान कार्यरत आहेत. मात्र मोबाईल नेटवर्क नसल्याने या जवानांना त्यांच्या कुटुंबियांसोबत संवाद साधण्यात अडचण निर्माण होत होती. ही बाब लक्षात घेऊन सेंट्रल आर्म्ड पॅरामिल्ट्री फोर्सच्या वतीने भामरागड येथे एक टॉवर मंजूर करण्यात आला आहे.

Web Title: Mobile tower in naxal areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.