मोबाईल टॉवरचे सर्व्हेक्षण धिम्यागतीने

By admin | Published: June 5, 2014 09:53 PM2014-06-05T21:53:47+5:302014-06-05T22:15:43+5:30

गेल्या काही वर्षांत शहरात खासगी व शासकीय जागेत हजारोंच्या संख्येने अनाधिकृत मोबाईल टॉवर उभारण्यात आले आहेत.

Mobile tower survey | मोबाईल टॉवरचे सर्व्हेक्षण धिम्यागतीने

मोबाईल टॉवरचे सर्व्हेक्षण धिम्यागतीने

Next

ठेका रद्द करण्याची संजय बालगुडे यांची मागणी
पुणे : गेल्या काही वर्षांत शहरात खासगी व शासकीय जागेत हजारोंच्या संख्येने अनाधिकृत मोबाईल टॉवर उभारण्यात आले आहेत. त्याविषयीचे सर्वेक्षण करून महापालिकेला उत्पन्न मिळवून देण्याविषयीचा ठेका एक कंपनीला दिला होता. मात्र, गेल्या वर्षेभरात केवळ १२५ ते १३० प्रस्ताव दाखल झाले असून, केवळ २६ प्रस्तावांना मंजुरी मिळाली आहे. ठेकेदारांच्या कासव गतीच्या कामांमुळे महापालिकेला अर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे संबंधित कंपनीचा ठेका रद्द करावा, अशी मागणी नगरसेवक संजय बालगुडे यांनी आज केली.
महापालिकेच्या हद्दीत अंदाजे ४ हजार अनाधिकृत टॉवर आहेत. इमारतीचे कोणतेही स्ट्रक्चरल ऑडीट नसताना धोकादायक टॉवर उभारले आहेत. टॉवरचे सर्व्हेक्षण करून त्यांना मिळकत कर आकारणी करावयाची आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात शहरात टॉवर असताना कंपनीकडून धिम्या गतीने कामे सुरू आहेत. त्यामुळे महापालिकेला अर्थिक तोटा होत आहे. मोठ्या टॉवर कंपन्या व ठेकेदारांचे साठेलोटे असल्यामुळे की काय ? अशा कासवे गतीने सर्व्हेक्षण केल्यास आणखी १०० वर्षे वाट पहावी लागेल. त्यामुळे संबंधित ठेकेदाराची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी बालगुडे यांनी पत्रकार परिषदेत केली.

Web Title: Mobile tower survey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.