‘मोडक सागर’ भरला
By admin | Published: July 16, 2017 01:16 AM2017-07-16T01:16:40+5:302017-07-16T01:16:40+5:30
तलाव परिसरात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे तलावाच्या पातळीत झपाट्याने वाढ होत असल्याने मोडक सागर तलाव शनिवारी सकाळी ६.३२ वाजता
- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : तलाव परिसरात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे तलावाच्या पातळीत झपाट्याने वाढ होत असल्याने मोडक सागर तलाव शनिवारी सकाळी ६.३२ वाजता भरून वाहू लागला. या तलावातून मुंबईला दररोज ४५५ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होतो. अन्य तलावांतही पाण्याची
पातळी वाढत असल्याने मुंबईकरांचे पाण्याचे टेन्शन लवकरच मिटणार आहे.
अपुऱ्या पावसाने २०१५ मध्ये मुंबईत पाणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती. त्या काळात मुंबईकरांना वर्षभर पाणीकपातीचा सामना करावा लागला होता. परंतु गेल्या वर्षी तलाव परिसरात चांगला पाऊस झाल्यामुळे पाण्याचे टेन्शन नव्हते. मधल्या काळात मध्य वैतरणा जलवाहिनीनेही मुंबईचा जलसाठा वाढवला. त्यामुळे मुंबईला दररोज ३७५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जात आहे.
या वर्षी पावसाने चांगला जोर धरला आहे. त्यामुळे प्रमुख तलावांपैकी एक असलेला मोडक सागर तलाव शनिवारी सकाळी भरल्याने धरणाचे दोन दरवाजे खुले करण्यात आले आहेत. या तलावापाठोपाठ मुंबईतील विहार तलावही लवकरच भरून वाहण्याच्या मार्गावर आहे. मात्र मुंबईला वर्षभर चांगला पाणीपुरवठा होण्यासाठी तलावांमध्ये १ आॅक्टोबर रोजी साडेचौदा लाख दशलक्ष लीटर जलसाठा असणे आवश्यक आहे.
मुंबईला दररोज
3750
दशलक्ष लीटर्स पाणीपुरवठा होतो.
मुंबईत पाण्याची मागणी दररोज
4200
दशलक्ष लीटर्स एवढी आहे.
रोज २५ ते ३० टक्के म्हणजे सुमारे ९०० लीटर्स पाणी गळती व चोरीमध्ये वाया जाते.
गतवर्षी हा तलाव १ आॅगस्टला रात्री साडेदहाच्या सुमारास ओसंडून वाहू लागला.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांत सध्या ८ लाख ९९ हजार ३८८ द.लि. पाणीसाठा आहे.