‘माध्यमांनी संयम बाळगावा’
By admin | Published: July 30, 2015 03:17 AM2015-07-30T03:17:47+5:302015-07-30T03:17:47+5:30
याकूब मेमनच्या फाशीचे वृत्तांकन करताना माध्यमांनी संयम बाळगावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. याकूबच्या फाशीबाबत कायदेशीर कार्यवाही होईलच;
मुंबई : याकूब मेमनच्या फाशीचे वृत्तांकन करताना माध्यमांनी संयम बाळगावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. याकूबच्या फाशीबाबत कायदेशीर कार्यवाही होईलच; पण अशा वेळी सर्वच माध्यमांनी संयम बाळगणे आवश्यक आहे, असे विधान भवनात पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
याकूबच्या फाशीवर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्यानंतर राज्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाळ, मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली. याकूबला फाशी दिली जात असताना राज्यातील कायदा व सुव्यवस्था चांगली राहावी यासाठी सतर्क राहण्यास तसेच संवेदनशील ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढविण्यास त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. सूत्रांनी सांगितले की, नातेवाइकांनी मागणी केल्यास याकूबचा मृतदेह त्यांच्या स्वाधीन केला जाईल. कुटुंबाला त्याचा मृतदेह नको असल्यास याकूबच्या दफनाबाबत नागपूर कारागृहाचे अधीक्षक निर्णय घेतील. त्या परिस्थितीत याकूबला नागपूर कारागृहातच दफन केले जाईल, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.