'एसटी'च्या खाकीला आधुनिकतेची झालर
By Admin | Published: July 20, 2016 10:18 PM2016-07-20T22:18:18+5:302016-07-20T22:18:18+5:30
एस.टी.महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची खाकी वर्दी म्हणजे गणवेश बदलणार, या चर्चेला बुधवारी अखेर पूर्णविराम मिळाला. वर्षानुवर्षे खाकी रंगात दिसणारे कर्मचारी यापुढेही खाकीतच दिसणार आहेत
औरंगाबाद : एस.टी.महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची खाकी वर्दी म्हणजे गणवेश बदलणार, या चर्चेला बुधवारी अखेर पूर्णविराम मिळाला. वर्षानुवर्षे खाकी रंगात दिसणारे कर्मचारी यापुढेही खाकीतच दिसणार आहेत. मात्र ह्यएसटीह्णच्या खाकीला एक प्रकारे आधुनिकतेची झालर दिली जात आहे.
गणवेशाची डिझाईन निश्चित करण्यासाठी एका संस्थेसोबत करार करण्यात आला आहे. या संस्थेने बुधवारी प्रादेशिक कार्यालयात अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या गणवेशांच्या डिझाईनचे सादरीकरण केले. एस. टी. महामंडळाच्या चालक-वाहकांचा पारंपरिक गणवेश म्हणून खाकीकडे पाहिले जाते. ह्यएसटीह्णची सेवा सुरू झाल्यापासून खाकीलाच प्राधान्य देण्यात आले. मात्र, आता नव्या गणवेशाच्या माध्यमातून अधिकारी- कर्मचाऱ्यांना नवीन चेहरा दिला जात आहे. हा नवीन चेहरा देताना एस.टी.महामंडळाच्या स्थापनेपासून कर्मचाऱ्यांच्या गणवेशाचा रंग कायम ठेवण्यात आला आहे. केवळ प्रत्येक पदानुसार गणवेशात विशिष्ट बदल आणि खाकीचा रंग गडद आणि फिकट करण्यात येत आहे. चालक-वाहकांचा गणवेश गडद खाकी रंगाचा तर वाहतूक विभागातील अधिकाऱ्यांचा गणवेश फिकट खाकी रंगाचा राहील. तर यांत्रिक विभागातील कर्मचाऱ्यांचा गणवेशही निळ्या रंगाचा कायम राहणार आहे.