आदिवासी शाळेच्या भरारीला आधुनिक तंत्रज्ञानाचे पंख

By admin | Published: February 15, 2017 08:34 AM2017-02-15T08:34:38+5:302017-02-15T08:34:38+5:30

इगतपुरीतील मोगरे गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मार्ग सुकर होण्यासाठी महिंद्रा इंटरट्रेड कंपनीने अँडव्हान्स फिचर असलेले प्रोजेक्टर भेट देत सामाजिक बांधिलकी जपली आहे.

Modern tech feathers are filled with tribal school filling | आदिवासी शाळेच्या भरारीला आधुनिक तंत्रज्ञानाचे पंख

आदिवासी शाळेच्या भरारीला आधुनिक तंत्रज्ञानाचे पंख

Next

ऑनलाइन लोकमत /लक्ष्मण सोनवणे

बेलगाव कुऱ्हे (नाशिक), 15 -  इगतपुरी तालुक्यातील मोगरे या संपूर्ण आदिवासी वस्ती असलेल्या गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मार्ग सुकर होण्यासाठी महिंद्रा इंटरट्रेड कंपनीने अँडव्हान्स फिचर असलेले प्रोजेक्टर भेट देत सामाजिक बांधिलकी जपली आहे.


या प्रोजेक्टरच्या सहाय्याने शिकण्याची प्रक्रि या अधिक सुलभ होणार असून ग्रामीण विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने दैनंदिन अध्ययन आणि अध्यापन करणे शक्य होणार आहे. तसेच ई-लर्निंग साधनामुळे प्रगत शैक्षणिक शाळा साध्य होणार असून शाळेच्या विकासाच्या भरारीला मदतीचे पंख मिळाले आहेत.


ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेची शिक्षणपद्धती बदलण्यासाठी औद्योगिक क्षेत्राचे योगदान महत्वाचे असून कारखानदारांनी जर पुढाकार घेतला तर नक्कीच दर्जेदार शिक्षण तळागळातील वंचित घटकांना मिळण्यास मदत होईल, असे प्रतिपादन इगतपुरीचे शिक्षण विस्तार अधिकारी नंदकुमार मोरे यांनी केले.


शाळेतील शिक्षकांना ई-लर्निंग साहित्य वापराचे तिन दिवसाचे प्रशिक्षण देवून प्रशिक्षित केले जाणार असल्याचे मिहंद्रा इंटरट्रेड कंपनीचे व्यवस्थापक दुसाने यांनी सांगितले.


खेड्यापाड्यातील शाळांमध्ये देखील आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शिक्षण दिल्याने विद्यार्थ्यांची गुणवत्ता निश्चित वाढणार आहे.-निवृत्ती नाठे, अध्यक्ष तालुका शिक्षक संघ

Web Title: Modern tech feathers are filled with tribal school filling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.