माेदी आणि शहा हेच तुकडे तुकडे गॅंगचे प्रमुख : याेगेंद्र यादव
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2020 08:09 PM2020-02-17T20:09:16+5:302020-02-17T20:10:45+5:30
माेदी आणि शहा हेच तुकडे तुकडे गॅंगचे प्रमुख असल्याची घाणाघाती टीका याेगेंद्र यादव यांनी केली.
पुणे : हिंदू मुस्लिम समाजामध्ये तेढ निर्माण करुन हिंसाचार घडवणे हा सर्वात माेठा देशद्राेह आहे. पंतप्रधान नरेंद्र माेदी आणि गृहमंत्री अमित शहा हे खरे तुकडे तुकडे गॅंगचे प्रमुख आहेत अशा शब्दात स्वराज इंडिया पक्षाचे प्रमुख याेगेंद्र यादव यांनी माेदी आणि शहा यांच्यावर टीका केली.
पुण्यातील काेंढवा भागात सुरु असलेल्या प्रती शाहीनबाग आंदाेलनाला पाठींबा देण्यासाठी यादव आज पुण्यात आले हाेते. यावेळी आयाेजित पत्रकार परिषदेत ते बाेलत हाेते. सीएए, एनआरसी आणि एनपीआरच्या विराेधात भारत जाेडाे आंदाेलन करण्यात येणार असून 22 फ्रेब्रुवारी ते 23 मार्च या दरम्यान या कायद्यांविषयी नागरिकांमध्ये जागृती करणार असल्याचेही यादव यांनी यावेळी स्पष्ट केले.
यादव म्हणाले, सीएए, एनआरसी यांना विराेध करण्यासाठी 'हम भारत के लाेग' ही चळवळ उभी करण्यात आली. या चळवळीत आता 125 हून अधिक संघटना सहभागी झाल्या आहेत. हे केवळ मुस्लिम समाजाचे नाही तर सर्वच समाजाचे आंदाेलन झाले आहे. तरुण माेठ्या संख्येने या कायद्यांच्या विराेधात रस्त्यावर उतरले आहेत. याचे आता 'भारत जाेडाे' या आंदाेलनात आम्ही रुपांतर करत आहाेत. ते ताेडायचे काम करतील आम्ही जाेडायचे काम करु. भारत जोडो हे आंदोलन हे एका नवीन भारताच्या निर्मिती चे आंदोलन असणार आहे. एन पी आरच्या माध्यमातून एनआरसी आणले जात आहे. एनपीआर आणि जनगणनेचा कुठलाही संबंध नाही. जनगनणेचा वेगळा कायदा आहे. एनपीआर हे सिटीझनशिप अमेंटमेंट कायद्याच्या अंतर्गत येते. प्रधानमंत्री सीएएवर स्पष्टतेने बाेलतात परुंतु एनपीआर आणि एनआरसीवर बाेलण्यास तयार नाहीत.
श्रीलंकेचे अनेक तमिळ हिंदू नागरिकत्व मागतायेत त्यांना सरकार का नागरिकत्व देत नाही ? असा प्रश्न देखील यादव यांनी उपस्थित केला. तसेच स्वामी विवेकानंद यांनी शिकागाेमध्ये म्हंटले हाेते की या देशात शरणागती मागणाऱ्या प्रत्येकाला या देशाने नागरिकत्व द्यायला हवे. भाजपा विवेकानंद यांच्या विचारांना माननार आहे की नाही असेही ते यावेळी म्हणाले. शाहीनबागच्या आंदाेलनाबाबत बाेलताना ते म्हणाले, नागरिकांना कमीत कमी त्रास हाेईल अशा पद्धतीने आंदाेलन करायला हवे. यावर मार्ग काढता येऊ शकताे. सीएए रद्द करता येणार नाही असा सर्वाेच्च न्यायालयाने म्हंटले आहे या प्रश्नावर बाेलताना ते म्हणाले हा सर्वाेच्च न्यायालयाची परीक्षा पाहणारा कायदा आहे.
राज्य सरकारच्या चारित्र्य पडताळण्याची ही वेळ
महाराष्ट्र सराकरचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी माझ्यासाेबत मंचावर येत सीएए, एनआरसीला विराेध केला. परंतु राज्य सरकारने सीएएच्या बाजूने परिपत्रक काढले. त्यामुळे राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी. तसेच तसे परिपत्रक काढावे अशी मागणी यादव यांनी केली. तसेच ही राज्य सरकारच्या चारित्र्य पडताळणीची वेळ असल्याचेही ते यावेळी म्हणाले.