सामना टाळण्यासाठीच मोदींनी क:हाड टाळले : चव्हाण
By admin | Published: October 14, 2014 01:29 AM2014-10-14T01:29:55+5:302014-10-14T01:29:55+5:30
क:हाडला गेलो तर माङयाशी सामना होईल़ म्हणूनच त्यांनी क:हाडला येण्याचे टाळले,’ असा टोला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी लगावला़
Next
क:हाड (जि़ सातारा) : ‘गुजरात मॉडेलची टीमकी वाजविणा:या नरेंद्र मोदींना लोकसभा निवडणुकीपूर्वीपासून एकाच व्यासपीठावर येण्याचे आव्हान देतोय; पण त्यांनी ते अद्याप स्वीकारलेले नाही़ क:हाडला गेलो तर माङयाशी सामना होईल़ म्हणूनच त्यांनी क:हाडला येण्याचे टाळले,’ असा टोला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी लगावला़
क:हाड येथे प्रचार सांगता सभेत ते बोलत होत़े
चव्हाण म्हणाले, गेले काही दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी क:हाडला येणार येणार, असे ऐकत होतो़ मोदींचे सभेचे राजकारण झाले. पंतप्रधान तिथे जातात, जिथे विजयाची थोडीशी तरी खात्री असते. यातून तुम्ही काय ओळखायचं ते ओळखलं असेलच! अशी कोटीही त्यांनी केली़ गुजरात आमचा छोटा भाऊ आह़़े त्यानं प्रगती केली तर आम्हाला आनंदच वाटेल; पण गुजरातचे महत्त्व वाढविण्यासाठी महाराष्ट्रावर अन्याय करायचा प्रयत्न केला तर ते आम्ही सहन करणार नाही़, असा इशारा त्यांनी दिला़
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून भाजपाकडे चेहरा नाही़ मुख्यमंत्रिपदावरून त्यांच्यात वाद आह़े हा वाद असाच कायम ठेवत मोदी आणि शहांना दिल्लीतून रिमोटद्वारे महाराष्ट्र चालवायचा असल्याची टीका त्यांनी केली़
तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अहंकारामुळे आघाडी फुटली. मात्र आघाडीमुळे राज्याचे नुकसान होत असल्याने काँग्रेस पक्षालाचा एकहाती सत्ता द्या, असे आवाहन करीत महाराष्ट्राची फाळणी करण्याचा भाजपाचा डाव असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी येथे केला. भाजपाचा हा डाव जनता हाणून पाडेल, असा विश्वास सांगलीच्या पलूस तालुक्यातील रामानंद नगरमध्ये प्रचारसभेत त्यांनी व्यक्त केला़ (प्रतिनिधी)