मोदी विसरले बाळासाहेबांचे उपकार!
By admin | Published: January 20, 2017 12:19 AM2017-01-20T00:19:21+5:302017-01-20T00:19:21+5:30
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान पदी विराजमान झाले
अमरावती : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान पदी विराजमान झाले, पण सत्तेवर येताच हे उपकार मोदी विसरले, अशी टीका शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी गुरुवारी अमरावती येथे केली.
शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना खा. सावंत म्हणाले, मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना तेथे जातीय दंगली उसळल्या. तेव्हा तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी लालकृष्ण अडवाणी यांना मुंबईत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेऊ गुजरातमध्ये मुख्यमंत्री बदलायचा काय, याबाबत विचारणा करण्यास पाठविले होते. मात्र, मोदींना मुख्यमंत्री पदावरून हटवू नका. मोदींशिवाय गुजरातमध्ये आहे तरी काय, असे म्हणत बाळासाहेबांनी मोदींचे मुख्यमंत्री पद वाचविले होते.
गुजरातचे मुख्यमंत्रीपद कायम राहिल्याने आज ते देशाचे पंतप्रधान होऊ शकले. मात्र, ज्या शिवसेनेच्या बळावर भाजपने केंद्र व राज्यात सत्ता काबीज केली, आज तेच शिवसेनेला कमी लेखत आहेत, असे ते म्हणाले.