महाराष्ट्रावर मोदी सूड उगवत आहेत
By admin | Published: October 1, 2014 03:15 AM2014-10-01T03:15:04+5:302014-10-01T03:15:04+5:30
मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचे षड्यंत्र रचणा:या मोदींना राज्यातील जनतेने मतदानातून सडेतोड उत्तर द्यावे, असे आवाहन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
Next
>पृथ्वीराज चव्हाणांचा हल्ला : काँग्रेसच्या प्रचाराचा तुळजापुरात शुभारंभ
उस्मानाबाद : सागरी सुरक्षा अकॅडमीसारखे अनेक प्रकल्प गुजरातकडे वळविले जात आहेत. अवघ्या 15 दिवसांवर निवडणूक असताना राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करून महाराष्ट्रावर सूड उगवला जात असून, मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचे षड्यंत्र रचणा:या मोदींना राज्यातील जनतेने मतदानातून सडेतोड उत्तर द्यावे, असे आवाहन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
तुळजापूर येथे मंगळवारी काँग्रेसच्या प्रचाराचा शुभारंभ झाला. या वेळी ते बोलत होते. राष्ट्रवादीने सरकारचा पाठिंबा काढून एकप्रकारे भाजपासोबत हातमिळवणी केली, असा आरोपही त्यांनी केला. महाराष्ट्रापासून मुंबई तोडू पाहणा:या मोदींना छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद कसा मिळेल, असा सवाल करीत गुजरातकडे जाणारी मुंबई महाराष्ट्राने 1क्5 जणांचे हौतात्म्य देऊन मिळविली. त्याचाच सूड मोदी उगवत असून, केंद्रात सत्ता आल्यानंतर मोदींनी रिझव्र्ह बँक ऑफ इंडियाचे तीन विभाग गुजरातला नेले. मुंबईतील गोदी बंदरही गुजरातमध्ये हलविले. यामुळे अनेकांना बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्रातील जनता हे सहन करणार का? असा सवालही त्यांनी केला.
व्यासपीठावर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, नारायण राणो, शिवाजीराव पाटील निलंगेकर, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, पतंगराव कदम, हर्षवर्धन पाटील, तुळजापूरचे उमेदवार मधुकरराव चव्हाण, बसवराज पाटील आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)
मदार राहुल गांधींवर!
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे पक्षाचे मुख्य प्रचारक असतील व प्रचारात ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रामुख्याने लक्ष्य करतील, असे पक्षाच्या सूत्रंकडून समजते.