मोदी, माझी अडचण असेल तर तुतारी वाजवून टाका; सुजय विखेंनी हात जोडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2024 16:41 IST2024-04-16T16:38:34+5:302024-04-16T16:41:12+5:30
भाजपचे लोकसभा उमेदवार सुजय विखे पाटील यांनी सर्वांच्या भुवया उंचावणारे वक्तव्य केले आहे.

मोदी, माझी अडचण असेल तर तुतारी वाजवून टाका; सुजय विखेंनी हात जोडले
आज अहमदनगर लोकसभा मतदारसंघात एक खळबळजनक किस्सा घडला आहे. पाथर्डी येथील बुथ कमिट्यांच्या बैठकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना भाजपचे लोकसभा उमेदवार सुजय विखे पाटील यांनी सर्वांच्या भुवया उंचावणारे वक्तव्य केले आहे. आमची सर्वांची अडचण असेल तर तुतारी वाजून टाका, असे सुजय विखे यांनी म्हटले आहे.
कार्यकर्त्यांना त्यांचे समाजातील बोलण्याचे महत्व पटवून देताना विखेंनी वरील वक्तव्य केले आहे. तुम्ही सगळेजण आम्ही तुमच्या जीवावर राजकारण करतो. आज भाजपाचा कार्यकर्ता समाजात वावरत असताना काय बोलतो याला खूप महत्व आहे. तुम्हाला याची जाणीव नसेल, असे विखे म्हणाले.
काही लोकांना सुजय विखे मान्य नसेल तर मोदींचे नाव सांगा, आमची दोघांची अडचण असेल तर ताईंचे नाव सांगा. तिघांची अडचण असेल तर मुंडेंचे नाव सांगा असे म्हणत शेवटी त्यांनी आमची सर्वांची अडचण असेल तर तुतारी वाजून टाका म्हणत भर व्यासपीठावरून हात जोडले. यावेळी एका कार्यकर्त्याने आम्हाला राहुल गांधी यांना पंतप्रधान करायचे नाहीय, असे म्हटले.