2013 मध्ये मोदी, 2023 मध्ये फडणवीस! जपानने शासकीय अतिथी म्हणून बोलावले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2023 09:58 AM2023-08-19T09:58:25+5:302023-08-19T10:00:18+5:30
फडणवीस २० ते २५ ऑगस्टपर्यंत जपान दौऱ्यावर असणार आहेत.
जपान सरकारने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 'स्टेट गेस्ट' म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. फडणवीस २० ते २५ ऑगस्टपर्यंत जपान दौऱ्यावर असणार आहेत.
यावेळी फडणवीस हे जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा यांची भेट घेणार आहेत. राष्ट्रप्रमुख किंवा त्याच्या समकक्षीय नेत्यालाच स्टेट गेस्ट म्हणून जपानचे सरकार आमंत्रण देते. परंतू, २०१३ मध्ये गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना जपानने स्टेट गेस्ट म्हणून बोलविले होते. यानंतर मोदी पंतप्रधान झाल्यावर अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनची घोषणा झाली होती.
फडणवीसांच्या दौऱ्यावेळी जपानच्या शाही महालात स्नेह भोजनाचे ही आयोजन केले जाणार आहे. एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांचा एक गट फडणवीसांसोबत जपान दौऱ्यावर असणार आहे. सुनिटोमो, एनटीटी आणि सोनीसारख्या कंपन्यांसोबत गुंतवणुकीवर चर्चा केली जाणार आहे. तसेच विरार सी लिंक, ठाणे कोस्टल रोड आणि नागपुर- गोवा एक्सप्रेस वे या प्रकल्पांसाठी जपानकडून अल्प व्याजदरात कर्ज उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. राज्यातील मेट्रो प्रकल्पात गुंतवणूक करणाऱ्या 'जेआसीए'च्या अधिकाऱ्यांची भेट घेतील. सोबतच जपान- इंडिया असोसिएशनच्या अधिकाऱ्यांशीही चर्चा करतील.