मोदी...गडी बोलायला हुश्शार; म्हणे, मी त्यांना राजकारणात आणले!

By admin | Published: January 6, 2017 04:42 AM2017-01-06T04:42:20+5:302017-01-06T04:42:20+5:30

मोदी..गडी बोलायला फार हुशार... म्हणे, पवारांनी बोट धरून मला राजकारणात आणलं. ऐकून म्हटलं मेलो आपण! भाषण असं ठोकून देतोय की, समोरच्याला वाटतं नक्कीच छाती ५६ इंचाची आहे

Modi ... insult to speak; That is, I brought them into politics! | मोदी...गडी बोलायला हुश्शार; म्हणे, मी त्यांना राजकारणात आणले!

मोदी...गडी बोलायला हुश्शार; म्हणे, मी त्यांना राजकारणात आणले!

Next

नाशिक : मोदी..गडी बोलायला फार हुशार... म्हणे, पवारांनी बोट धरून मला राजकारणात आणलं. ऐकून म्हटलं मेलो आपण! भाषण असं ठोकून देतोय की, समोरच्याला वाटतं नक्कीच छाती ५६ इंचाची आहे, असे चिमटे काढत राष्ट्रवादीचे नेते खा. शरद पवार यांनी नोटाबंदीच्या निर्णयावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आपल्या शैलीत टीका केली.
पिंपळगाव बसवंत येथील शेतकरी मेळाव्यात बोलताना पवार यांनी मोदी सरकारला जोरदार चिमटे काढले. ते म्हणाले, नोटाबंदीची घोषणा करताना ‘पचास दिन मुझे दे दो’ असं मोदी म्हणाले होते. पन्नास दिवस उलटून गेले तरी

जनतेचे हाल संपलेले नाहीत. आता ह्यांना कोणत्या चौकात उभं करायचं? कोणता आसूड हाती घ्यायचा? चाबूक घ्यायचा की वेताची छडी घ्यायची? शिवसेनेचे लोक त्यांचे सहकारी आहेत. काल उद्धव ठाकरेंचं भाषण ऐकलं. म्हटलं बाबा तुम्ही सगळे गळ्यात गळे घालणारे लोक आहात. तुम्हीच ठरवा काय ते!

संसदेजवळच्या बँकेत २४ हजार रुपये काढायला माणूस पाठवला तर १० हजारच मिळाले. तेव्हा आमच्या सारख्या खासदारांची ही गत असेल तर चलनटंचाईने तुम्हाला किती मनस्ताप झाला असेल हे समजण्यासारखे आहे, असे सांगून पवार म्हणाले, सरकारची पुढची पायरी सोनं आहे. आमच्या आई-बहिणींच्या गळ्यात किती सोनं आहे याची चौकशी करणार आहेत. म्हणजे आम्ही लोकसभेचे अखेरचे सभासद ठरलो... पुन्हा कधी लोक आम्हाला संसदेत पाठवणार नाहीत. आमचीच अशी दैना झाली म्हणजे काय करायचं? कुणी बोलायचं? पवारांच्या या गुगलीवर एकच हशा पिकला. नोटबंदीवर आज जनता गप्प असली तरी ती मतपेटीतून व्यक्त होईल. काँग्रेस सरकारने आणीबाणीचा घेतलेला निर्णय असाच अंगलट आला होता. पुढे भुईसपाट व्हावे लागले, ही आठवणही पवार यांनी करून दिली.

Web Title: Modi ... insult to speak; That is, I brought them into politics!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.