मोदी-शहांनी केले हात वर!

By admin | Published: September 23, 2014 05:38 AM2014-09-23T05:38:13+5:302014-09-23T08:43:34+5:30

यापूर्वी जेव्हा शिवसेना-भाजपातील वाद चिघळत होते तेव्हा अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी हे नेते त्यामध्ये हस्तक्षेप करीत

Modi-Shah's hands up! | मोदी-शहांनी केले हात वर!

मोदी-शहांनी केले हात वर!

Next

मुंबई : शिवसेनेबरोबर युती ठेवायची किंवा तोडून टाकायची याचा निर्णय घेण्यास किंवा सध्या सुरू असलेल्या वादात थेट हस्तक्षेप करण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी नकार दिला आहे. युतीबाबतचा काय तो
निर्णय महाराष्ट्रातील नेत्यांनी घ्यावा, अशी दिल्लीची भूमिका असल्याने राज्यातील भाजपाच्या प्रमुख पदाधिका-यांची बैठक उद्या, मंगळवार २३ सप्टेंबर रोजी दादर येथील पक्ष कार्यालयात बोलावली आहे. यापूर्वी जेव्हा शिवसेना-भाजपातील वाद चिघळत होते तेव्हा अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी हे नेते त्यामध्ये हस्तक्षेप करीत. वेळप्रसंगी शिवसेना नेत्यांशी थेट बोलत. मात्र जागावाटपावरून शिवसेनेबरोबर सुरू असलेल्या वादावर जेव्हा नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्याशी चर्चा झाली,
तेव्हा युतीबाबतचा अंतिम निर्णय महाराष्ट्रातील नेत्यांनी घेण्याचे आदेश दिले. युती तोडली तर शिवसेनेला सहानुभूती लाभणार नाही ना, अशी शंका भाजपाच्या नेत्यांना भेडसावत आहे. जिल्हाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीतून यासंदर्भातील चित्र स्पष्ट व्हावे, अशी भाजपाच्या राज्यातील नेत्यांची अपेक्षा आहे. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Modi-Shah's hands up!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.