काँग्रेसच्या तिकीटावर मोदी पण हरले असते - निरुपम
By admin | Published: June 8, 2014 04:23 PM2014-06-08T16:23:55+5:302014-06-08T16:24:10+5:30
भाजपचे नरेंद्र मोदी हे काँग्रेसच्या तिकीटावर उभे राहिले असते तर त्यांचादेखील पराभव झाला असे वादग्रस्त विधान काँग्रेसचे मुंबईतील नेते संजय निरुपम यांनी केले आहे.
Next
>ऑनलाइन टीम
मुंबई, दि. ८- देशभरात काँग्रेसविरोधात मतदारांमध्ये संताप निर्माण झाल्याने पक्षाचा दारुण पराभव झाला. भाजपचे नरेंद्र मोदी हे काँग्रेसच्या तिकीटावर उभे राहिले असते तर त्यांचादेखील पराभव झाला असे वादग्रस्त विधान काँग्रेसचे मुंबईतील नेते संजय निरुपम यांनी केले आहे.
उत्तर मुंबई मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणा-या संजय निरुपम यांनी पत्रकारांशी संवाद साधला. लोकसभा निवडणुकीतील पराभवाची कारणमीमांसा करताना निरुपम म्हणाले, गेल्या १० वर्षात लोकहिताचे अनेक निर्णय घेऊनही देशात काँग्रेसविरोधात संताप निर्माण झाला होता. मोदींनी समजा काँग्रेसमधून लोकसभा निवडणूक लढवली असती तर त्यांचादेखील पराभव झाला असता.
गेल्या १० वर्षात यूपीए सरकारने घेतलेल्या निर्णयांविरोधात सर्वसामान्यांमध्ये रोष निर्माण झाला होता. महागाई, भ्रष्टाचार यामुळे पक्षाची स्थिती आणखी बिकट झाल्याचे निरुपम यांनी सांगितले. प्रत्येक निवडणुकीतून काही शिकण्यासारखे असते. आता विधानसभा निवडणुकीतील निकाल लोकसभेसारखा लागणार नाही असे विश्वासही निरुपम यांनी व्यक्त केला.