मोदीजी, 'मन की बात' कराच, पण कधीतरी मराठवाड्याबद्दलही बोला - कन्हैया कुमार
By admin | Published: April 24, 2016 06:28 PM2016-04-24T18:28:27+5:302016-04-24T19:09:28+5:30
भारत माताचे स्वरूप बदलत चालले आहे, भारत माता की जय ची ठेकेदारी चालणार नाही असे खडे बोल कन्हैया कुमारने भाजपासह संघालाही सुनावले तो पुण्यातील बालगंधर्व सभागृहातील सभेत बोलत होता.
Next
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. २४ - मोदीजी, 'मन की बात' कराच, पण कधीतरी मराठवाड्याबद्दलही बोला, सरकारमध्ये आहात, तर जनतेला रोजगार द्यावाच लागेल.'केवळ जाहिरातबाजीवर खर्च करुन योजना यशस्वी होत नाहीत', 'राष्ट्रवाद शब्दामागे ब्राह्मणवादाचा छुपा अजेंडा आहे. अशी टीका मोदी आणि संघावर कन्हैया कुमार केली. तो पुण्यातील बालगंधर्व सभागृहातील सभेत बोलत होता.
भारत माताचे स्वरूप बदलत चालले आहे, भारत माता की जय ची ठेकेदारी चालणार नाही असे खडे बोलही त्याने सुनावले. कन्हैया कुमारने भाजपासह संघालाही सुनावले. मातेची अडचण नाही पण कधी रोहित वेमुलांच्या आईला भेटा, त्या आईची वेदना काय असेल जिच्या मुलावर चप्पल भिरकावली जाते, मुलीवर बलात्कार होत आहेत. तुमची संवेदना नष्ट झाली का? असा सवालही त्यांने उपस्थित केला.
नव्या पिढीने यागोष्टी समजून घ्या, योगाला आमचा विरोध नाही पण काय घ्यायचे आणि काय सोडायचे हे पहा असे म्हणत योगगुरु रामदेव बाबावर ही कडकडून टीका केली. देशातील व्यवस्था आणि परंपरा मिठवायची असेल तर पुण्याची पारंपरिक पगडीतील पिवळी पट्टी निळी करा, असे आवाहन कन्हैय्या कुमारनी केले . कन्हैयाच्या हातात कोणत्याही प्रकारचे लिखित भाषण नसल्याचे आढळून आले. कोणत्याही आविर्भावाशिवाय, अभिनिवेशाशिवाय त्याने संपूर्ण भाषण उत्स्फूतपणे केले.
अत्यंत कडक पोलीस बंदोबस्त कार्यक्रमस्थळी ठेवण्यात आला आहे. 40-50 गाड्यांच्या ताफ्यासह तो मुंबईहून पुण्यात दाखल झाला आहे. बालगंधर्व रंगमंदिर परिसरात तुफान गर्दी असून, पास असलेल्या व्यक्तींनाच सभेला प्रवेश देण्यात आला. परिसराला पोलिसांच्या छावणीचे स्वरूप प्रप्त झालं होतं. बालगंधर्व रंगमंदिरातील कन्हैया कुमारच्या कार्यक्रमाला अमोल पालेकर, संध्या गोखले , बाबा आढाव, सिद्धार्थ धेंडे, मुक्ता मनोहर ,किरण मोघे संदीप बर्वे उपस्थित होते. पासशिवाय प्रवेश मिळत नसल्यामुळे बालगंधर्व च्या गेटवर तरूणांची घोषणाबाजी केली.
कन्हैया कुमारच्या भाषाणातील ठळक मुद्दे -
मोदीजी, 'मन की बात' कराच, पण कधीतरी मराठवाड्याबद्दलही बोला -
जेवढे रोहित माराल, तेवढे रोहित जन्माला येतील
आज चर्चा आयडेंटिटी चे राजकारण करत आहात पण आम्ही जात संपवायूला निघालो आहोत सर्वाना समान अधिकार मिळवा
मला भीती दाखवण्याच सोडा, मा कोणालाही घाबरत नाही
मोदींनी ट्विट करुन सांगीतले की ग्रामीण भागाला टेक्नॉंलॉजीने जोडणार, पण या टेक्नॉलॉजीला दुष्काळाशी जोडा अस मी म्हणेल
पोलीसांची ठेकेदारी केली आता संसदेची पण करा
विमानात जे काही झाले त्याबद्दल पोलीस खोट बोलत आहेत
असं तंत्रज्ञान बनवा, ज्यामुळे मराठवाड्यातील दुष्काळ दूर होईल
जेव्हा लोकांच्या पोटाचा प्रश्न तीव्र होईल, तेव्हा सर्वजण रस्त्यावर उतरतील
कोणाचा सौदा करीत आहेत प्रश्न उपस्थित केला तर हल्ले केले जातात हेच राजकारण आहे
तुम्ही नाव बदला आम्ही समाज बदलतो
मेक इन इंडियाचा पेंडाल जळाला तुमच्यासाठी पण काळिज आमचं जळत होतं
आमचे हक्क अधिकार द्या बाकी काही नको
कोणी काय खायचे हे ठरविण्याचा प्रत्येकाला अधिकार
राष्ट्रवाद शी काही घेणेदेणे नाही एक धर्म आणि संस्कृती लादण्याचा प्रयत्न
प्रक्षोभक भाषणं करून आम्हाला निवडणुका लढवायच्या नाहीत तरीही मला आल्या आल्या पोलिसांनी नोटीस दिली
देशातील सर्वांना शिक्षण कसं मिळेल, याचा विचार आम्ही करत आहोत
जातीव्यवस्था देशातून हटवली पाहिजे
जेव्हा लोकांच्या पोटाचा प्रश्न तीव्र होईल, तेव्हा सर्वजण रस्त्यावर उतरतील
जातीवादाविरोधात एकत्र लढाई लढू
देशात विकासाच्या मुद्द्यावर चर्चा का नाही?
देशातील जातीव्यवस्था नष्ट होऊन प्रत्येकाला समान अधिकार मिळायला हवा.