‘सार्क’ परिषदेवर बहिष्कार टाकण्याचा मोदींचा निर्णय चुकीचा - स्वामी अग्निवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2016 03:48 PM2016-10-08T15:48:22+5:302016-10-08T15:50:04+5:30
भारत-पाकिस्तान मधील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर 'सार्क' परिषदेवर बहिष्कार टाकण्याचा पंतप्रधान मोदींचा निर्णय चुकीचा होता असे वक्तव्य स्वामी अग्निवेश यांनी केले.
Next
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. ८ - रत-पाकिस्तान मधील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर 'सार्क' परिषदेवर बहिष्कार टाकण्याचा पंतप्रधान मोदींचा निर्णय चुकीचा होता असे वक्तव्य स्वामी अग्निवेश यांनी केले. कितीही मोठे संकट असले तरी, त्यावर संवादाने मार्ग निघू शकतो, चर्चा हेच कोणत्याही वादावर प्रभावी माध्यम असू शकते, असे स्वामी अग्नीवेश यांनी शनिवारी स्पष्ट केले. तसेच सर्जिकल स्ट्राईक ही देशासाठी नवीन गोष्ट नाही. या पुढे देखील संरक्षणासाठी याचा वापर होऊ शकतो. त्यामुळे आत्ता त्याचा इतका गाजावाजा करणे गरजेचे नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पत्रकार भवन येथे स्वामी अग्नीवेश यांच्या वार्तालापाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी ते बोलत होते. पुणे श्रमिक पत्रकारसंघाचे अध्यक्ष गजेंद्र बढे, सरचिटणीस अजय कांबळे, पुणे पत्रककार प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश कुटे या वेळी उपस्थित होते. उरी हल्ल्यानंतर भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकवरुन विविध आरोप प्रत्यारोप होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर बोलताना स्वामी अग्नीवेश म्हणाले, देशातील विविध प्रश्नांवर संवाद करण्यासाठी संसद, आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर चर्चेसाठी संयुक्त राष्ट्रसंघ जसे महत्त्वाचे आहे, तसेच सार्क परिषद आशियाई देशांसाठी महत्त्वाची आहे. मात्र आपल्या पंतप्रधानांनी सार्क रद्द करण्यासाठी पुढाकार घेतला. हे अत्यंत दुर्भाग्यपूर्ण आहे. संवादाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असतते. उलट आतंकवाद विरोधी लढ्यासाठी इस्लामाबाद येथे होत असलेल्या सार्क परिषदेचा उपयोग करता आला असता. त्यात आतंकवादा विरोधात लढा देण्यासाठी सार्क देशांचे संयुक्त सैन बनविण्याबातची भूमिका देखील मांडायला हवी होती.