मोदींची बदनामीकारक पोस्ट; एकाविरूद्ध सायबर गुन्हा
By admin | Published: July 1, 2016 05:26 PM2016-07-01T17:26:21+5:302016-07-01T17:33:31+5:30
व्हॉटस्अप ग्रुपवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात बदनामीकारक पोस्ट टाकल्याप्रकरणी तालुक्यातील एका ग्रुपमधील सुनिल खातळे यांच्यावर इगतपुरी पोलीस ठाण्यात सायबर
ऑनलाइन लोकमत
इगतपुरी, दि. १ - व्हॉटस्अप ग्रुपवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात बदनामीकारक पोस्ट टाकल्याप्रकरणी तालुक्यातील एका ग्रुपमधील सुनिल खातळे यांच्यावर इगतपुरी पोलीस ठाण्यात सायबर कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका व्हॉटस्अप ग्रुप मध्ये सुनिल खातळे गेल्या काही दिवसापासुन भारतातील महापुरुषांवर टीका करणे, पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या विरोधात बदनामीकारक मजकूर पोस्ट करणे असे प्रकार सुरू होते. मात्र या विरोधात महेश श्रीश्रीमाळ यांनी ग्रुपवर असे काही टाकू नये अशी सुचना वारंवार केल्या होती. मात्र कोणताही ठोस कारवाई संबंधित ग्रुपने केली नाही. त्यामुळे खातळे यांच्या विरुध्द सायबर कायद्यान्यवे गुन्हा दाखल करण्यात यावा अशी तक्रार इगतपुरी पोलीस ठाण्यात भाजपाचे युवा मोर्चा प्रदेश चिटणीस महेश श्रीश्रीमाळ व भाजपाच्या तालुका पदाधिकाऱ्यांनी दिली होती. त्यामुळे खातळे यांच्यावर भारतीय दंड विधान कलम १५३ अ, ५००, ५०४, ५०९ प्रमाणे इगतपुरी पोलीस ठाण्यात सायबर कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन तालुक्यात ही पहिलीच घटना आहे.
याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक संजय शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक एम. एन. मांडवे करीत आहे. यावेळी भाजपाचे युवा मोर्चा जिल्हा सचिव पांडुरंग ब-हे, तालुकाध्यक्ष अण्णा डोंगरे, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब धोंगडे, शहराध्यक्ष अँड. मुन्ना पवार, घोटी शहराध्यक्ष जगन भगत, कोषाध्यक्ष संदीप शहाणे, शहर सरचिटणीस सागर हांडोरे, तालुका उपाध्यक्ष कैलास कस्तुरे, घोटी शहर सरचिटणीस सैय्यद रंगरेज, आदीवासी आघाडीचे राजु गांगड आदी उपस्थित होते.