अजितदादांनी कधीही भाजपामध्ये प्रवेश घेतलेला नव्हता- सुप्रिया सुळे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2019 08:52 PM2019-12-03T20:52:39+5:302019-12-03T20:54:54+5:30
भाजपासोबत जाऊन पुन्हा राष्ट्रवादीत आलेल्या अजित पवारांची सध्या जोरदार चर्चा आहे.
मुंबईः भाजपासोबत जाऊन पुन्हा राष्ट्रवादीत आलेल्या अजित पवारांची सध्या जोरदार चर्चा आहे. त्यांना राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्रिपद मिळणार का, याचीच उत्कंठा त्यांच्या कार्यकर्त्यांना लागून राहिली आहे. राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्रिपद न मिळाल्यास अजितदादा पुन्हा वेगळा विचार करू शकतात, अशीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यासंदर्भात सुप्रिया सुळेंना विचारलं असता त्या म्हणाल्या, अजितदादांनी कधीही भाजपामध्ये प्रवेश घेतलेला नव्हता. पक्ष आणि कुटुंब ही आमची अंतर्गत बाब आहे. ते पक्षाचे वरिष्ठ नेते आणि कायमच माझे मोठे भाऊ राहतील. तसेच काल शरद पवारांनी मोदींनी दिलेल्या ऑफरच्या केलेल्या खुलाशावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. राष्ट्रवादीला त्यांनी तशी ऑफर दिली हे मोदींचं मोठेपण आहे. त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. त्यांनी सांगितलं, तसं काहीही झालं नसल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. राष्ट्रवादी जर शिवसेनेसोबत जाऊ शकते, तर भाजपासोबत का नाही? असा प्रश्न सुप्रिया यांना विचारण्यात आला होता. त्यावर स्पष्टीकरण देताना, सुप्रिया सुळेंनी शरद पवार आणि नरेंद्र मोदींच्या भेटीचं विश्लेषणही केलं.
Nationalist Congress Party leader Supriya Sule on Ajit Pawar: He had not joined BJP. This is internal matter of our party and family. He will always remain my elder brother and senior leader of the party. https://t.co/VXX3MzV7IXpic.twitter.com/jdamrW8L8x
— ANI (@ANI) December 3, 2019
महाराष्ट्रातील राजकारणात आमचे वैयक्तिक संबंध अतिशय चांगले असतात. भलेही आमच्या विचारात काही प्रमाणात अंतर असेल, पण आमचे वैयक्तिक संबंध चांगले राहिले आहेत. त्यामुळे आम्ही शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला. पवारसाहेब माझे केवळ वडिल नाहीत, तर माझे बॉसही आहेत. नोकरी टिकवायची असेल तर, बॉस इज ऑलवेज राईट... असे म्हणत शरद पवारांचा शब्द आमच्यासाठी अंतिम असल्याचं खासदार सुप्रिया सुळेंनी म्हटलंय.
Nationalist Congress Party leader Supriya Sule on Sharad Pawar's claim that PM Modi offered cabinet berth for Sule if BJP-NCP alliance happens: Ye pradhan mantri ji ka badappan hai ki unhone aisa sujhav diya. Main unki aabhari hoon unhone kaha, lekin wo ho nahi paya. pic.twitter.com/3dVyqKqDDU
— ANI (@ANI) December 3, 2019