खोटे बोलण्यात मोदींना ‘गोल्ड मेडल’

By admin | Published: October 14, 2014 01:28 AM2014-10-14T01:28:43+5:302014-10-14T01:28:43+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिका दौ:यात भारताला सक्षम केल्याचे सांगितले. मोदींच्या अवघ्या तीन महिन्यांच्या सत्तेच्या काळात भारत सक्षम कसा झाला?,

Modi's 'gold medal' in lieu | खोटे बोलण्यात मोदींना ‘गोल्ड मेडल’

खोटे बोलण्यात मोदींना ‘गोल्ड मेडल’

Next
श्रीगोंदा (अहमदनगर) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिका दौ:यात भारताला सक्षम केल्याचे सांगितले. मोदींच्या अवघ्या तीन महिन्यांच्या सत्तेच्या काळात भारत सक्षम कसा झाला?, असा सवाल करत ऑलिंपिक स्पर्धेत खोटे बोलण्यासाठी मोदींना गोल्ड मेडल मिळेल, असा टोला काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी लगावला़ 
श्रीगोंदा येथे काँग्रेसचे उमेदवार हेमंत ओगले यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होत़े दिग्विजय सिंह म्हणाले की, भाजपावाल्यांनी जातीय दंगली घडवून सत्ता मिळविली़ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य सहा वेळेस दहशतवादी कारवाईत सापडले आहेत़ त्यामुळे त्यांचा चेहरा उघडा झाला आह़े 
शरद पवार यांनी मुख्यमंत्रिपदासाठी वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसला़ आता मुख्यमंत्री त्यांचाच व्हावा म्हणून आघाडी मोडली़ मात्र, राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री करणो हे त्यांचे स्वप्न पूर्ण होणार नाही, असे ते म्हणाल़े (प्रतिनिधी)

 

Web Title: Modi's 'gold medal' in lieu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.