मोदींच्या योजना म्हणजे नुसतंच पेंढा भरलेलं बाहुलं- राज ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2018 10:17 PM2018-02-12T22:17:24+5:302018-02-12T22:17:40+5:30
मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या भाषणातून नव्हे, तर व्यंगचित्रांतून व्यक्त होतायत. अनेकदा ते राजकारण्यांवर टीकात्मक व्यंगचित्र रेखाटत असतात.
मुंबई- मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या भाषणातून नव्हे, तर व्यंगचित्रांतून व्यक्त होतायत. अनेकदा ते राजकारण्यांवर टीकात्मक व्यंगचित्र रेखाटत असतात. अशा प्रकारे त्यांनी मोदींच्या योजनांना लक्ष्य करणारं व्यंगचित्र काढलं आहे. या व्यंगचित्रातून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शाहा यांच्यावर फटकारे मारले आहेत.
व्यंगचित्रात अहो, कधी तरी आमच्याही छकुल्याचं कौतुक करा ना, असा मोदी मनमोहन सिंगांना सांगताना दाखवण्यात आलं आहे. त्यावर मनमोहन सिंगांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मोदीजी, नक्की केले असते पण त्यात नुसताच पेंढा भरलाय, असं उत्तर मनमोहन सिंग यांनी दिलं आहे. व्यंगचित्रातून मोदी हातातून बाबागाडी घेऊन जात असताना पेंढ्याच्या स्वरूपात एक प्रतीकात्मक बाहुलं दाखवण्यात आलं आहे. त्या पेंढ्यानं भरलेल्या योजनारूपी बाहुल्याला जाहिरातबाजीचं विशेषण लावण्यात आलं आहे. तर मोदींच्या मागे अमित शाह खेळणी घेऊन चालताना दाखवण्यात आले आहेत.
अमित शाहांच्या हातातील थैल्याला जुमला असं संबोधण्यात आलं आहे. त्यानंतर नरेंद्र मोदी काँग्रेसचं कौतुक करतानाही दाखवण्यात आलं आहे. देशानं जी काही प्रगती केली, त्याचे सर्व श्रेय आजवरच्या सरकारांना जाते हे मी अभिमानानं कबूल करतो. तसे मी लाल किल्ल्यावरूनही सांगितले आहे. पण तेवढा उदारपणा तुम्ही कधी दाखवला का ?, असं नरेंद्र मोदी काँग्रेसला विचारत असल्याचं व्यंगचित्रातून दाखवण्यात आलं आहे.