हनुमानाच्या कृपेनेच मोदी पंतप्रधान - चंद्रकांत खैरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 03:32 AM2018-01-22T03:32:26+5:302018-01-22T03:32:59+5:30
लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे दक्षिणमुखी हनुमानाच्या दर्शनासाठी दौलताबाद येथे आठ दिवस मुक्काम ठोकून होते. हनुमंताच्या कृपेनेच मोदी सरकार सत्तेवर आले, असे वादग्रस्त वक्तव्य शिवसेना नेते खा. चंद्रकांत खैरे यांनी रविवारी वैदिक संमेलनात केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.
औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे दक्षिणमुखी हनुमानाच्या दर्शनासाठी दौलताबाद येथे आठ दिवस मुक्काम ठोकून होते. हनुमंताच्या कृपेनेच मोदी सरकार सत्तेवर आले, असे वादग्रस्त वक्तव्य शिवसेना नेते खा. चंद्रकांत खैरे यांनी रविवारी वैदिक संमेलनात केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.
संमेलनाच्या उद्घाटन सत्रात बोलताना केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री सत्यपाल सिंह यांनी मानवी उत्पत्तीचा डार्विनचा सिद्धान्त खोटा असल्याचे वादग्रस्त विधान केले होते. तर आज समारोपात खा. खैरे यांनी त्यावरही कडी केली.
खैरे म्हणाले, दक्षीणमुखी हनुमानाची कृपा झाल्यामुळेच केंद्रात मोदी यांचे सरकार आले. हनुमानाचा आशीर्वाद मिळावा म्हणून अमित शहा दौलताबादला आले होते.
सोमरस हे मद्य नव्हे!
वैदिक संमेलनात डॉ. सुनील सांबारे यांचे ‘सोमरस व सोमयाग’ विषयावर व्याख्यान झाले. सोमरस म्हणजे दारू-मद्य असते, हा गैरसमज दूर करण्याची गरज आहे. सोमरस हे मद्यपेय नसून ताणतणाव दूर करण्यासाठी ते उपयोगी आहे, असा दावा डॉ. सांबारे यांनी केला.