Mohit Kamboj: 'हनुमान चालीसा लावण्यासाठी मोफत भोंगे देवू', भाजप नेते मोहित कंबोज यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2022 04:11 PM2022-04-05T16:11:08+5:302022-04-05T16:11:15+5:30
Mohit Kamboj: भाजप नेते मोहित कंबोज यांनी हनुमान चालीसा लावण्यासाठी मोफत भोंगे देण्याची घोषणा केली आहे.
मुंबई: गुढीपाडव्याच्या दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील अनिधिकृत भोग्यांमधून चालणाऱ्या अजानविरोधात हनुमान चालीसा लावण्याचे आवाहन केले. राज ठाकरेंच्या त्या भूमिकेचे भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी यांनी स्वागत केले, तसेच हनुमान चालीसा लावण्यासाठी मोफत लाऊडस्पीकर(भोंगा) देण्याची घोषणा केली आहे.
मंदिर में लगाने के लिए जिसको लाउड स्पीकर ( भोंगे ) चाहिए वो निशुल्क हमसे माँग सकता हैं !
— Mohit Kamboj Bharatiya - मोहित कंबोज भारतीय (@mohitbharatiya_) April 4, 2022
सभी हिंदू की एक आवाज़ होनी चाहिए !
मंदिरावर हनुमान चालिसा यासाठी भोंगे आम्ही देवू ज्यांना लावायचे आहेत त्यांना !
हिंदु एकता आवाज आलाच पाहिजे !
जय श्री राम ! हर हर महादेव !
काय म्हणाले मोहित कंबोज?
भाजपच्या सर्वात श्रीमंत नेत्यांपैकी एक असलेल्या मोहित कंबोज यांनी ट्विट केले की, "ज्यांना मंदिरात लाऊडस्पीकर लावायचे आहे, त्यांनी आमच्याकडून मोफत घेऊन जावे. सर्व हिंदूंचा एकच आवाज! जय श्री राम! हर हर महादेव," असे कंबोज म्हणाले. तसेच, सर्वोच्च न्यायालयाने भोंग्या संदर्भात काय ऑर्डर दिली, याची माहिती मोहित कंबोज व्हिडिओच्या माध्यमातून दिली.
My Appeal To Home Minister Maharashtra @Dwalsepatil Ji ! pic.twitter.com/zeVtdoMq1v
— Mohit Kamboj Bharatiya - मोहित कंबोज भारतीय (@mohitbharatiya_) April 5, 2022
प्रकरणावर गृहमंत्र्यांची प्रतिक्रिया
लवकरच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत आणि त्याआधी भाजप आणि मनसे हिंदुत्व कार्ड खेळताना दिसत आहेत. हे दोन्ही पक्ष शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. वास्तविक, मशिदीबाहेर लाऊडस्पीकर लावू नयेत, ही मागणी मुळात बाळ ठाकरेंनीच केली होती. या संपूर्ण प्रकरणावर महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांचे वक्तव्यही आले आहे. समाजात फूट पाडण्यासाठी अशी विधाने केली जात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
मनसेकडून हनुमान चालीसा लावण्यात आली
दरम्यान, राज ठाकरेंच्या भूमिकेनेतर महाराष्ट्रातील अनेक भागात मनसे नेत्यांकडून हनुमान चालीसा लाऊडस्पीकरवर वाजवली जात आहे. नुकतेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींमधील लाऊडस्पीकर बंद करण्याची मागणी केली होती. राज ठाकरे यांनी शनिवारी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात मशिदींबाहेरील लाऊडस्पीकर हटवण्याचा इशारा दिला होता. तसेच, अजानचा विरोध म्हणून हनुमान चालीसा लावण्याचे आवाहन केले होते.