मोहिते-पाटलांचा जामीन अर्ज फेटाळला

By Admin | Published: March 2, 2016 03:29 AM2016-03-02T03:29:59+5:302016-03-02T03:29:59+5:30

अकलूज येथील सुमित्रा पतसंस्थेतील लिपिक दिनकर दगडू भोसले याच्या आत्महत्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेले पतसंस्थेचे अध्यक्ष जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांच्यासह चौघांचा अटकपूर्व जामीन

Mohite-Patil's bail application is rejected | मोहिते-पाटलांचा जामीन अर्ज फेटाळला

मोहिते-पाटलांचा जामीन अर्ज फेटाळला

googlenewsNext

सोलापूर : अकलूज येथील सुमित्रा पतसंस्थेतील लिपिक दिनकर दगडू भोसले याच्या आत्महत्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेले पतसंस्थेचे अध्यक्ष जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांच्यासह चौघांचा अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. वाय. जाधव यांनी सोमवारी फेटाळला.
संचालक सुभाष रामलिंग दळवी, विजय विश्वनाथ शिंदे आणि मनोज भारत रेळेकर अशी अटकपूर्व जामीन फेटाळलेल्या अन्य तिघांची नावे आहेत. सुमित्रा पतसंस्थेत भोसले हा लिपिक म्हणून कार्यरत होता. आरोपींनी त्याच्यावर अपहार केल्याचा ठपका ठेवत, त्याची खोमनाथ (ता. मंगळवेढा) येथील शेतजमीन, तसेच पत्नीच्या नावे असलेली खंडाळी येथील जमिनीची विक्री करून ८१ लाख रुपये पतसंस्थेत जमा करून घेतले.
परंतु केवळ ४१ लाखांची पावती दिली. याशिवाय भोसले याची अकलूज येथील सुजय नगरातील वडिलोपार्जित दुमजली इमारतीची किंमत ६० ते ७० लाख रुपये असताना, ती ३ लाख ८० हजार रुपयांमध्ये विकण्यास भाग पाडले.
आणखी रक्कम किती येणे आहे, त्याचा हिशोब न देता आरोपी सतत मानसिक त्रास देत होते. त्यामुळे पत्नीची पुणे येथे बदली करून घेतल्यानंतरही तिच्या नावे चेक घेऊन फौजदारी खटला दाखल करण्याची धमकी दिली.
आरोपींच्या या सततच्या छळास कंटाळून दिनकर भोसले याने १२ जानेवारी २०१६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात विष प्राशन करून आत्महत्या केली. पत्नी कल्याणी भोसले हिने सदर बझार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, जयसिंह मोहिते-पाटील यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Mohite-Patil's bail application is rejected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.