विनयभंगप्रकरणी सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2017 01:34 AM2017-06-07T01:34:42+5:302017-06-07T01:34:42+5:30

भर रस्त्यामध्ये सिग्नलजवळ हात धरून तिचा विनयभंग करणाऱ्यास एक वर्षे सक्तमजुरी आणि १ हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली

Molestation case | विनयभंगप्रकरणी सक्तमजुरी

विनयभंगप्रकरणी सक्तमजुरी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा पाठलाग करून भर रस्त्यामध्ये सिग्नलजवळ हात धरून तिचा विनयभंग करणाऱ्यास एक वर्षे सक्तमजुरी आणि १ हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी गजानन नंदनवार यांनी हा आदेश दिला आहे. दंड न भरल्यास अतिरिक्त तीन महिने कारावास भोगावा लागेल, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.
युवराज जयवंत महारूगडे (वय २५, रा. कसबा पेठ) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. ही घटना १६ मार्च २०१३ रोजी घडली होती. सहायक सरकारी वकील वामन कोळी यांनी ५ साक्षीदार तपासले. तरुणीची साक्ष यामध्ये महत्त्वाची ठरली.
फिर्यादी तरुणी भारती विद्यापीठाच्या दंतवैद्यकीय उपचार महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. तरुणी महाविद्यालयातून घराच्या दिशेने चालली होती. कोरेगाव पार्क रस्त्याने जात असताना दुचाकी आडवी घालून तिला अडविण्याचा
प्रयत्न केला.

Web Title: Molestation case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.