चर्चगेटमध्ये तरुणीचा विनयभंग

By admin | Published: July 16, 2017 01:14 AM2017-07-16T01:14:55+5:302017-07-16T01:14:55+5:30

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत विकृतांचा मनस्ताप वाढताना दिसत आहे. बोरीवली, सीएसटीएम, पवईतील विकृतीच्या घटना ताज्या असतानाच, चर्चगेट रेल्वे स्थानकात

Molestation of girl in Churchgate | चर्चगेटमध्ये तरुणीचा विनयभंग

चर्चगेटमध्ये तरुणीचा विनयभंग

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईत विकृतांचा मनस्ताप वाढताना दिसत आहे. बोरीवली, सीएसटीएम, पवईतील विकृतीच्या घटना ताज्या असतानाच, चर्चगेट रेल्वे स्थानकात तरुणीचा विनयभंग झाल्याची घटना उघडकीस आली आहे. हा घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. शनिवारी याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली. या वाढत्या घटनांमुळे मुंबईतील महिला असुरक्षित असल्याचे समोर आले आहे.
चर्चगेट रेल्वे स्थानकात ८ जुलै रोजी एक तरुणी प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर लोकलची वाट पाहत उभी होती. दरम्यान, तिथूनच एक तरुण चालत आला. तरुणीचे लक्ष लोकलकडे असल्याचे पाहून, या तरुणाने तिच्या जवळ जात तिला स्पर्श केला. तरुणी क्षणाचाही विलंब न करता, त्याच्या मागे धावत गेली आणि तिने त्याला पकडल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे.
या प्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून रेल्वे पोलिसांनी आरोपीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळचा मध्य प्रदेशचा रहिवासी असलेला आरोपी काळाघोडा परिसरात बहिणीसोबत राहत होता. तो अल्पवयीन असल्याने, त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.
यापूर्वी बोरीवली, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर (सीएसटीएम) अशा वर्दळीच्या ठिकाणीही अशा घटना घडल्या आहेत. या वाढत्या घटनांमुळे मुंबईतील महिलांमध्ये असुरक्षिततेची भीती वाढत चालली आहे. सुरक्षित मुंबई गेली कुठे, असा संतप्त सवाल महिलांकडून उपस्थित केला
जात आहे.

महाविद्यालय, रेल्वे स्थानक लक्ष्य
यापूर्वी बोरीवली, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर (सीएसटीएम) विकृताने महिला प्रवाशांना पाहून अश्लील चाळे केल्याची घटना समोर आली होती. त्या पाठोपाठ पवई महाविद्यालयाच्या आवाराबाहेर दुचाकीस्वारांनी विद्यार्थिनींसमोर विकृत कृत्य केले होते.

Web Title: Molestation of girl in Churchgate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.