अल्पवयीन मुलीचा विनयभंग
By admin | Published: September 8, 2016 09:20 PM2016-09-08T21:20:59+5:302016-09-08T21:20:59+5:30
अल्पवयीन मुलीचा ४२ वर्षीय इसमाने विनयभंग केल्याची घटना उजेडात आली असून, पोलिसांनी आरोपीला अटक करुन गुन्हा दाखल केला
Next
ऑनलाइन लोकमत
मेहकर, दि. 8 - एका ७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा ४२ वर्षीय इसमाने विनयभंग केल्याची घटना उजेडात आली असून, पोलिसांनी आरोपीला अटक करुन गुन्हा दाखल केला आहे.
स्थानिक शिवाजीनगरस्थित विजय जगनराव लहाने वय ४२ यांच्या किराणा दुकानावर ६ सप्टेंबरच्या रात्री ८ वाजताच्या सुमारास एक ७ वर्षीय अल्पवयीन मुलगी मेहंदी घेण्यासाठी गेली होती. दरम्यान आरोपीने तिला काऊंटरवरुन उचलून दुकानात घेतले व बाजुलाच असलेल्या गोडावूनमध्ये नेऊन विनयभंग केला.
पोलिसांनी सदर आरोपीला अटक करुन भादंवी कलम ३५४ (अ), सहकलम १२, ८ चिल्ड्रेन अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलिस उपनिरिक्षक टी.के.गव्हाणे हे करीत आहेत.