व्हॉटसअॅपवर अश्लील मेसेज पाठवून तरुणीचा विनयभंग
By admin | Published: July 13, 2017 08:37 PM2017-07-13T20:37:30+5:302017-07-13T20:37:30+5:30
मोबाईलवरील व्हॉटसअॅपवरुन कोपरीतील एका तरुणीला अश्लील फोटो आणि संदेश पाठवून विनयभंग करणाऱ्या एका तरुणाविरुद्ध कोपरी पोलीस ठाण्यात
ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. 13 - मोबाईलवरील व्हॉटसअॅपवरुन कोपरीतील एका तरुणीला अश्लील फोटो आणि संदेश पाठवून विनयभंग करणाऱ्या एका तरुणाविरुद्ध कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्याचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
कोपरी पूर्व भागात राहणारी ही तरुणी घरी असतांना तिच्या मोबाईलवर ११ जुलै रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास या अनोळखी व्यक्तिने ‘देशी चॅट ओनली फॉर लेडीज’ या ग्रृपमध्ये तिच्या व्हॉटसअॅप क्रमांकाचा समावेश केला. त्याद्वारे तिला अचानक अश्लील फोटो आणि मेसेज पाठविले. हा प्रकार पाहून तिला धक्काच बसला. तिने याप्रकरण्ी कोपरी पोलीस ठाण्यात विनयभंग आणि आयटी अॅक्ट नुसार १२ जुलै रोजी गुन्हा दाखल केला. हे प्रकार करणाऱ्याचा शोध सुरु असून त्याचा पत्ता उत्तरप्रदेश येथील असल्याचे समजल्याचे कोपरी पोलिसांनी सांगितले.
‘‘ महिलांनी व्हॉटसअॅपवर आपला फोटो टाकतांना काळजीपूर्वक टाकावा. शक्यतो डीपीवर आपल्या फोटोऐवजी अन्य काही टाकल्यास ते योग्य होईल. तरीही असे फोटो किंवा कोणतीही आक्षेपार्ह क्लिपींग कोणी पाठविल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा.’’ -एम. डी. जाधव, पोलीस निरीक्षक, कोपरी पोलीस ठाणे.