या आनंदाच्या क्षणी काकासाहेब हवा होता : अविनाश शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2019 04:16 PM2019-06-27T16:16:27+5:302019-06-27T16:17:39+5:30
मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीत औरंगाबाद जिल्हाच्या सिंहाचा वाटा आहे.
औरंगाबाद - गेल्या अनेक वर्षांपासून राज्यात चर्चेत असलेला मराठा आरक्षणाचा मुद्दा आज उच्च न्यायालयानं निकाली काढला. मराठा समाजाला देण्यात आलेलं आरक्षण न्यायालयानं कायम ठेवलं आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी औरंगाबाद येथील काकासाहेब शिंदे यांनी आपला जीव दिला होता. या आनंदाच्या क्षणी काकासाहेब हवा होता अशी प्रतिकिया काकासाहेब यांचे भाऊ अविनाश शिंदे यांनी दिली आहे.
मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीत औरंगाबाद जिल्हाच्या सिंहाचा वाटा आहे. मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी कायगाव येथील काकासाहेब शिंदे यांनी नदीत उडी घेऊन आपला जीव दिला होता. आज आलेल्या निकालानंतर त्यांच्या कुटुंबांनी सरकारचे आभार माणले आहेत. आजच्या निकालानंतर आनंद सुद्धा आहे आणि दुसरीकडे काकासाहेब आमच्यात नाही याचे दुःख ही तेवढच असल्याचे शिंदे कुटंब म्हणाले. तर, या आनंदाच्या क्षणी काकासाहेब हवा होता अशी भावना अविनाश शिंदे यांनी व्यक्त केली.
राज्यात निघालेल्या ५८ मराठा क्रांती मोर्च्याची सुरवात औरंगाबादमधून झाली होती. ज्या क्रांती चौकातून पहिला मोर्चा निघाला,त्याच क्रांती चौकात मराठा समाज दिवाळी साजरी करणार आहे. तर यावेळी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जीव देणाऱ्या तरुणांना श्रद्धांजली सुद्धा वाहेली जाणार आहे.