मुलुंडमध्ये ATM चा घोळ, ३५ जणांच्या खात्यातून पैसे गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 03:40 AM2017-12-19T03:40:22+5:302017-12-19T03:40:39+5:30

मुलुंडमधील खातेदाराच्या मोबाइलवर आलेल्या मेसेजमुळे सोमवारी सर्वांचीच झोप उडाली. दिल्लीतील एटीएममधून त्यांच्या खात्यातून पैसे गेल्याचा हा संदेश होता.

Money in ATM of Mulund, money from 35 accounts is missing | मुलुंडमध्ये ATM चा घोळ, ३५ जणांच्या खात्यातून पैसे गायब

मुलुंडमध्ये ATM चा घोळ, ३५ जणांच्या खात्यातून पैसे गायब

googlenewsNext

मुंबई : मुलुंडमधील खातेदाराच्या मोबाइलवर आलेल्या मेसेजमुळे सोमवारी सर्वांचीच झोप उडाली. दिल्लीतील एटीएममधून त्यांच्या खात्यातून पैसे गेल्याचा हा संदेश होता. एकापाठोपाठ एक अशा ३५ तक्रारदारांनी नवघर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली आहे.
नवघर पूर्वेकडील कोटक महिंद्रा बँकेच्या एटीएममध्ये अखेरचे पैसे काढलेल्या खातेदारांचा यामध्ये समावेश आहे. मुलुंड रेल्वे स्थानकाशेजारी हे एटीएम आहे. रविवारी रात्रीपासूनच खातेदारांना बँकेतून पैसे जात असल्याचे मेसेज आले. स्किमर लावून पैसे चोरल्याचा, तसेच यामागे दिल्लीतील टोळीचा हात असल्याचा संशय नवघर पोलिसांना असून, त्या दिशेने तपास सुरू आहे.

Web Title: Money in ATM of Mulund, money from 35 accounts is missing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.