दीड लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर उद्यापासून जमा होणार पैसे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2020 04:23 AM2020-03-01T04:23:35+5:302020-03-01T04:24:03+5:30

आत्तापर्यंत १ लाख ४२ हजार ६७२ शेतक-यांचे प्रमाणीकरण झाले असून रविवार सुट्टी असल्यामुळे सोमवारपासून त्यांच्या बँकांत पैसे जमा होतील, अशी माहिती सहकार प्रधान सचिव आभा शुक्ला यांनी दिली.

Money will be credited to the account of 1.5 lakh farmers | दीड लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर उद्यापासून जमा होणार पैसे

दीड लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर उद्यापासून जमा होणार पैसे

Next

मुंबई : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील २१ लाख ८२ हजार शेतकऱ्यांची दुसरी यादी शनिवारी सहकार विभागाने प्रसिद्ध केली. या यादीतील शेतक-यांनाही व्यवस्थित लाभ मिळेल आणि त्यांच्या काही अडचणी असतील तर त्या तत्काळ सोडविण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. आत्तापर्यंत १ लाख ४२ हजार ६७२ शेतक-यांचे प्रमाणीकरण झाले असून रविवार सुट्टी असल्यामुळे सोमवारपासून त्यांच्या बँकांत पैसे जमा होतील, अशी माहिती सहकार प्रधान सचिव आभा शुक्ला यांनी दिली.
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत पहिली प्रायोगिक तत्त्वावरील यादी २४ फेब्रुवारीला लावण्यात आली होती. त्यात ६८ गावांतील १५ हजार ३५८ कर्जखाती जाहीर करण्यात आले होते. दुसºया यादीनंतर राज्यात आतापर्यंत २१ लाख ८२ हजार खात्यांच्या याद्या गावनिहाय जाहीर करण्यात आल्या आहेत.
राज्यात १५ जिल्ह्यांत पुर्णांशाने तर ग्रामपंचायत निवडणुकांची आचारसंहिता लागू असल्याने १३ जिल्ह्यांत अंशत: याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अपेक्षित अशा ३६ लाख ४५ हजार कर्जखात्यांपैकी पोर्टलवर ३४ लाख ९८ हजार खात्यांची माहिती अपलोड करण्यात आली आहे. त्यापैकी गावनिहाय यादी प्रसिद्ध केलेल्या खात्यांची संख्या २१ लाख ८२ हजार आहे. कर्जमुक्तीसाठी १४ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
>ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहितेमुळे
६ जिल्ह्यातील गावांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या नसल्याचे सहकार विभागाने सांगितले आहे. या प्रमाणीकरणानंतर संबंधित शेतकºयांच्या कर्ज खात्यावर व्यापारी बँका २४ तासांमध्ये तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका ७२ तासांमध्ये रक्कम जमा करणार आहेत.

Web Title: Money will be credited to the account of 1.5 lakh farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.