मांत्रिक काकाकडून पुतण्याचा खून!

By admin | Published: October 18, 2014 01:37 AM2014-10-18T01:37:25+5:302014-10-18T01:37:25+5:30

भूतबाधा झाल्याचा दावा करत भूत उतरवित असल्याचे सांगत एका मांत्रिकाने पुतण्याचा गळा दाबून खून केला.

Monk uncle killed! | मांत्रिक काकाकडून पुतण्याचा खून!

मांत्रिक काकाकडून पुतण्याचा खून!

Next
लखमापूर (चंद्रपूर) : भूतबाधा झाल्याचा दावा करत भूत उतरवित असल्याचे सांगत एका मांत्रिकाने पुतण्याचा गळा दाबून खून केला. अंधश्रद्धेतून कोरपना तालुक्यातील लखमापूर येथे तरुणाचा बळी गेल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या खुनी मांत्रिकाला अटक केली आहे. 
विठ्ठल रामदास पोटे (24) असे बळी गेलेल्या तरूणाचे नाव आहे. शरीरात भूत शिरल्यानेच तुझी प्रकृती बिघडत आहे. अंगातील भूत उतरविण्याशिवाय पर्याय नाही, असा दावा करून मांत्रिक असलेल्या संजय नागोबा पोटे (36) याने विठ्ठलचा गळा दाबून हत्या केली.
रात्री देवी अंगात संचारल्यानंतरच भूत उतरवावे लागते, असे सांगत पोटे याने कुटुंबातील सर्वाना पूजा मांडायला लावली. काही वेळानंतर पोटे याने माङया अंगात आता देवी संचारली आहे, असे सांगितले. त्यानंतर या मांत्रिकाने संजयचा गळा आवळत त्याच्या तोंडात विद्युत मोटारला लावलेल्या पाण्याची नळी टाकली. त्यामुळे विठ्ठलचा श्वास गुदरमरला. विठ्ठल सुटकेसाठी तडफडत होता. मात्र पोटे याने त्याचा गळा घट्ट आवळून पाण्याचा पाईप आणखी आत कोंबला. 
परिणामी विठ्ठलचा मृत्यू झाला. पोटे एवढय़ावरच थांबला नाही, तर त्याने विठ्ठलचे वडील रामदास पोटे यांच्यावरही दगडाने हल्ला केला. त्यात ते जखमी झाले.
विठ्ठलचा मृत्यू झाल्यानंतरही मोहिनी विद्येने मी त्याला जीवंत करतो, असे हा मांत्रिक ओरडून सांगत होता. विठ्ठलचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच, कुटुंबीयांनी घटनेबाबत शुक्रवारी पहाटे 4 वाजता गडचांदूर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी आरोपी संजय पोटेला अटक केली. मृत विठ्ठलच्या मागे पत्नी, आठ महिन्यांची मुलगी आहे. (वार्ताहर)
 
च्गेल्या महिन्यापासून पोटे कुटुंबातील देवीच्या देव्हा:यात रात्रीच्या वेळी पूजा केली जात होती. मांत्रिक संजय हातात त्रिशूल, लिंबू, धागा घेऊन बसायचा आणि घरी येणा:या रुग्णांवर उपचार करायचा.

 

Web Title: Monk uncle killed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.