मोनोला महिन्याला 75 लाखांचा तोटा

By admin | Published: June 30, 2014 01:40 AM2014-06-30T01:40:15+5:302014-06-30T01:40:15+5:30

मेट्रो रेल्वेवर प्रवाशांच्या उडय़ा पडत असताना 5 महिन्यांपासून कार्यान्वित असलेल्या मोनोला मात्र प्रवाशांचा दुष्काळ अनुभवण्यास मिळत आहे.

Mono lost a loss of Rs 75 lakhs a month | मोनोला महिन्याला 75 लाखांचा तोटा

मोनोला महिन्याला 75 लाखांचा तोटा

Next
>मुंबई : तीन आठवडय़ांपूर्वी सुरू झालेल्या मेट्रो रेल्वेवर प्रवाशांच्या उडय़ा पडत असताना 5 महिन्यांपासून कार्यान्वित असलेल्या मोनोला मात्र प्रवाशांचा दुष्काळ अनुभवण्यास मिळत आहे. त्यामुळे रोज जवळपास अडीच लाखांचा तोटा सहन करावा लागत असून, महिन्याकाठी सरकारला 75 लाखांचे नुकसान होत आहे. सुरुवातीचे दिवस वगळता रोज 14 तास सुरू राहूनही त्यातून 15 हजारांवर नागरिक त्यातून प्रवास करतात.  
 देशातील पहिली मोनो रेल्वे अशा बिरुदाने सुरू झालेल्या वडाळा ते चेंबूर या मार्गावर 8.8क् किलोमीटर अंतराची सेवा 2 फेब्रुवारी 2क्14 रोजी कार्यान्वित झाली. सुरुवातीचे 15-2क् दिवस मुंंबईकरांनी हौसेने त्यातून प्रवास केला. त्यामुळे काही काळ तिकडे नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. त्यानंतर मात्र त्यांची हौस संपली. हा मार्ग दैनंदिन प्रवासासाठी सोईचा नसल्याने प्रवाशांची संख्या रोडावत गेली. त्यामुळे आता वडाळा आणि तेथून संत गाडगे महाराज चौक (जेकब सर्कल) या मोनो-2 टप्प्याचे काम पूर्ण करण्याकडे प्राधिकरणाने प्राधान्य दिले आहे. त्याशिवाय नुकसान भरून काढण्यासाठी मोनोतून अन्य उत्पन्नाच्या मार्गाबाबत विचार करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
 
पर्यावरणाला पूरक, स्वच्छ, पोस्टरविरहित सुंदर शहरासाठी आग्रही असल्याचा दावा करणा:या एमएमआरडीएने आता मोनोतून होणारे नुकसान भरून काढण्यासाठी त्याकडे कानाडोळा करण्याचे ठरविले आहे. मोनो-1च्या सर्व स्थानकांचा परिसर व खांब जाहिरातीसाठी उपलब्ध केले जाणार आहेत. त्यासाठी इच्छुकांना आवाहन करण्यात आले असून, ई टेंडर काढले जाणार आहे. मोनोचा दुसरा टप्पा सुरू झाल्यावर प्रवाशांची संख्या वाढेल व तोटा कमी होईल, असे सहप्रकल्प संचालक (जनसंपर्क) दिलीप कवठकर यांनी सांगितले.

Web Title: Mono lost a loss of Rs 75 lakhs a month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.