मेट्रोनंतर आता मोनो रेल्वे

By admin | Published: September 7, 2014 12:57 AM2014-09-07T00:57:59+5:302014-09-07T00:57:59+5:30

उपराजधानीत मेट्रो रेल्वेच्या भूमिपूजनानंतर आता मोनो रेल प्रकल्पावरही काम सुरू झाले आहे. पहिल्या टप्प्यात मोनो रेल्वेची ५० किमी लांब लाईन टाकली जाईल. मोनो रेल्वेचे मार्गाचे सर्वेक्षण व अभ्यासासाठी

Mono Rail Now After Metron | मेट्रोनंतर आता मोनो रेल्वे

मेट्रोनंतर आता मोनो रेल्वे

Next

मनपाची तयारी : पहिल्या टप्प्यासाठी नेमणार तांत्रिक सल्लागार
नागपूर : उपराजधानीत मेट्रो रेल्वेच्या भूमिपूजनानंतर आता मोनो रेल प्रकल्पावरही काम सुरू झाले आहे. पहिल्या टप्प्यात मोनो रेल्वेची ५० किमी लांब लाईन टाकली जाईल. मोनो रेल्वेचे मार्गाचे सर्वेक्षण व अभ्यासासाठी तांत्रिक सल्लागाराची नियुक्ती करायची आहे. यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. स्थायी समितीच्या सोमवारच्या बैठकीत तांत्रिक सल्लागाराच्या नियुक्तीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. आयुक्त श्याम वर्धने यांनी मोनो रेल्वेच्या डीपीआरला (विस्तृत प्रकल्प अहवाल) यापूर्वीच मंजुरी दिली आहे.
मोनोरेल रॅपिड ट्रान्झिट सिस्टीमचा डीपीआर तयार करून वित्तीय मदतीसाठी केंद्र सरकारला पाठविला जाईल. तांत्रिक सल्लागाराच्या नियुक्तीवर येणारा खर्च केंद्र सरकारकडून मिळेल, अशी अपेक्षा महापालिकेला आहे. प्राप्त माहितीनुसार तांत्रिक सल्लागार म्हणून काम करण्यासाठी तीन कंपन्यांनी निविदा भरली आहे. यात मे. मोनार्च सर्व्हेअर अ‍ॅण्ड इंजिनियरिंग कन्सलटंट प्रा. लिमिटेडने प्रथम किमान निविदा आॅफर ४.८७ लाख रुपये प्रति किमी दिली आहे. याशिवाय हरियाणा, गुडगांव येथील आयसा व गुडगांवच्या राईट्स लिमिटेडने क्रमश: १४ लाख रुपये प्रति किमी व ७ लाख रुपये प्रति किमी या दराने काम करण्याची तयारी दर्शविली आहे. यामुळे मोनार्चच्या निविदेला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. तांत्रिक सल्लागाराला मोनो रेल्वेसाठी नवे मार्ग शोधावे लागतील. यामुळेच महापालिकेचे यावर काम सुरू आहे. मनपा आयुक्त श्याम वर्धने यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये तांत्रित सल्लागाराच्या नियुक्तीला मंजुरी दिली होती. (प्रतिनिधी)
असा आहे प्रकल्प
पहिल्या टप्प्यात ५० किमी लांबीची मोनो रेल रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम टाकायची आहे.
२५ जुलै २०१४ रोजी पहिली ‘प्री बीड’ मीटिंग घेण्यात आली.
५ आॅगस्ट २०१४ रोजी महापालिकेच्या वेबसाईटवर तांत्रिक सल्गाराच्या नियुक्तीसाठी निविदा प्रकाशित करण्यात आली.
१४ आॅगस्टपर्यंत तीन निविदाकारांनी अर्ज केला. यातील दोन गुडगांव तर एक पुण्याची कंपनी आहे. त्याच दिवशी निविदा उघडण्यात आली.
प्राप्त निविदेवर वाहतूक विभागातर्फे तांत्रिक मूल्यांकन करण्यात आले.
तांत्रिक व वित्तीय आधारावर मोनार्च सर्वेअरला सर्वाधिक गुण मिळाले.

Web Title: Mono Rail Now After Metron

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.